Actor Govinda Suffers Bullet Injury : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदाच्या स्वत:च्या बंदुकीतून मिसफायर झाल्याची धक्कादायक घटना आज ( १ ऑक्टोबर ) पहाटेच्या सुमारास घडली. गोविंदाच्या पायाला ही गोळी लागल्याने अभिनेता गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गोविंदाच्या ( Govinda ) पायातून डॉक्टरांनी गोळी काढली असून, तो आता सुखरुप आहे. सध्या अभिनेत्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोविंदाला फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी केली आहे.

हेही वाचा : Govinda News – Video : कौटुंबिक वाद विसरून गोविंदाच्या भेटीला पोहोचली कश्मीरा शाह, कृष्णा अभिषेक परदेशात असल्याची माहिती

मुख्यमंत्र्यांनी केली गोविंदाची विचारपूस

“मी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. ते लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी आणि त्यांच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीने सदिच्छा व्यक्त केल्या. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री दिली आहे. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्या प्रियजनांबरोबर आहेत. गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयातून लाखो लोकांना आनंद दिला आहे. ते लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहोत.” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून एक्स पोस्ट करत ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : “त्यांची फालतुगिरी सुरू होती, दोघांनी अफेअर…”, निक्की-अरबाजच्या नात्यावर पंढरीनाथ कांबळेचं रोखठोक मत; म्हणाला…

हेही वाचा : ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घौडदोड; १० दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गोविंदा ( Govinda ) पहाटे कोलकात्याला जाणार होता. यावेळी परवाना असलेली बंदुक कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून बंदुक पडली आणि अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली असं गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने सांगितलं. तर, “अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.” अशी माहिती त्याच्या पत्नीने ‘इंडियन एक्सप्रेस’ दिली आहे.