प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हरमन बावेजा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. ४३ वर्षीय हरमनची पत्नी साशा रामचंदानीने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याने २०२१ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षात हरमन व साशा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याला दोन वर्षांचा मोठा मुलगा आहे.

‘ई-टाइम्स’ मधील वृत्तानुसार, अभिनेता व निर्माता हरमनच्या जवळच्या एका व्यक्तीने यासंदर्भात माहिती दिली आहे. हरमन बावेजा आणि त्याची पत्नी साशा रामचंदानी यांनी मार्चमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलीचं स्वागत केलंय, असं या सूत्राने सांगितलं. या जोडप्याने २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. त्यांना पहिला मुलगा असून आता मुलगी झाली आहे. हरमन आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती शेअर करत नाही, त्यामुळे त्याने आपल्या दुसऱ्या मुलीच्या जन्माबाबत कोणतीही अपडेट शेअर केलेली नाही.

“माझ्या आयुष्यात…”, ५३ वर्षीय मनीषा कोईरालाचं जोडीदाराबाबत विधान; १२ वर्षांपूर्वी झालाय घटस्फोट

हरमन बावेजा आणि साशा रामचंदानी यांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याने चंदीगडमध्ये एका खासगी सोहळ्यात एंगेजमेंट केली होती आणि २१ मार्च २०२१ मध्ये त्यांनी लग्न केलं. हरमन बावेजा एक अभिनेता व निर्माता आहे, तर त्याची पत्नी साशा ही पोषणतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ आहे.

कोण आहेत रवीना टंडनचे पती? अनिल थडानी नेमका काय व्यवसाय करतात? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरमनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो अखेरचा २०२३ मध्ये आलेल्या ‘स्कूप’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. या सीरिजमध्ये त्याने एसीपी हर्षवर्धन ही भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचं चाहते व समीक्षकांनी कौतुक केलं होतं. या सीरिजमध्ये करिश्मा तन्ना, मोहम्मद झीशान अय्यूब, इनायत सूद, प्रोसेनजीत चॅटर्जी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. ही सीरिज पत्रकार जीग्ना वोराच्या आयुष्यावर आधारित होती. ही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.