‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट व रणवीर सिंह यांच्याबरोबर जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र व शबाना यांचा एक किसिंग सीन आहे. या किसिंग सीनबाबत धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी व अभिनेत्री हेमा मालिनींची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पत्नी शबाना आझमी व धर्मेंद्र यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील किसिंग सीनवर ‘अशी’ होती जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया

८७ वर्षीय धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात शबाना आझमी यांच्याबरोबर किसिंग सीन दिला आहे. त्याबाबत हेमा मालिनी म्हणाल्या, “धरमजी आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन मी अजुन पाहिलेला नाही. लोकांना हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे. मी धरमजींसाठी खूप आनंदी आहे कारण त्यांना नेहमी कॅमेरासमोर राहणं आवडतं.”

“रोमान्सला वयाची…” ७२ वर्षीय शबाना आझमींसह दिलेल्या किसिंग सीनवर ८७ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

दरम्यान, शबाना व धर्मेंद्र यांचा किसिंग सीन पाहून नेटकऱ्यांनी टीकाही केली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया समोर आली होती. “माझ्या आणि शबानाच्या किसिंग सीनमुळे प्रेक्षक नाराज झाल्याचं मी ऐकलं आहे. तर काही लोकांनी याचे कौतुकही केले आहे. मला वाटतं की लोकांना असं काही पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. गेल्या वेळी मी ‘लाइफ इन अ मेट्रो’मध्ये नफिसा अलीबरोबरही किसिंग सीन दिला होता. त्यावेळी लोकांनी त्याचे कौतुक केले होते,” असं धर्मेंद्र म्हणाले.

प्रसिद्ध अभिनेते आहेत अमिताभ बच्चन यांचे साडू, दोघांनी दोन चित्रपटात केलंय एकत्र काम, फोटो पाहून ओळखलंत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या किसिंग सीनबद्दल शबाना आझमींचे पती प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया काय होती, याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला होता. त्या म्हणाल्या, “मी पडद्यावर किसिंग सीन दिला याबद्दल त्यांना कुठलीही तक्रार नव्हती. पण हा सीन चित्रपटगृहात सुरू असताना प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते. तेव्हा माझ्या बाजूला बसलेले जावेद अख्तर म्हणाले, माझ्या बाजूला बसलेल्या या महिलेला मी ओळखत नाही.”