Vivek Oberoi Property: बॉलीवूडमधील करिअर अस्थिर आहे. प्रत्येक कलाकाराला कायमच यश मिळेल असं नाही. त्यामुळे कलाकार अभिनयाव्यतिरिक्त विविध उद्योगात गुंतवणूक करत असतात. प्रामुख्याने सेलिब्रिटी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. अभिनेता विवेक ओबेरॉय पैशांचं महत्त्व लहानपणीच समजलं होतं.

अभिनेते व राजकारणी सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा असला तरी विवेकला सगळं सहज मिळालं नाही. त्याच्या वडिलांनी त्याच्या आयुष्यात फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावली आणि कधीही आर्थिक मदत केली नाही, असा खुलासा विवेकने एका मुलाखतीत केला आहे.

दुबई प्रॉपर्टी इनसाइडर पॉडकास्टमध्ये विवेकने त्याच्या व्यवसायातील उलाढालींबद्दल सांगितलं. तसेच अभिनय करताना त्याने इतके व्यवसाय कसे सुरू केले, त्याबद्दल माहिती दिली. विवेकला त्याच्या वडिलांनी लहानपणापासूनच अर्थशास्त्र आणि व्यवसायाबद्दल शिकवलं. “ते एखादी वस्तू आणायचे आणि मी ते कसे विकणार आहे याबद्दल मला पूर्ण बिझनेस प्लॅन तयार करण्यास सांगायचे. मी वयाच्या १० व्या वर्षापासून व्यवसायातील बारकावे समजून घेतले, कारण त्यांनी आणलेलं सामान मी घरोघरी जाऊन विकायचो,” असं विवेक म्हणाला.

वडील म्हणायचे, “मी श्रीमंत आहे, तू नाही”

विवेकने सांगितलं की त्याचे वडील त्याला नेहमी म्हणायचे, “मी श्रीमंत आहे; तू नाहीस. तू श्रीमंत होशील, पण तुला त्यासाठी स्वतः काम करावं लागेल.” विवेक म्हणाला की त्याचं बालपण त्याच्या बऱ्याच मित्रांपेक्षा खूप वेगळं होतं. त्याच्या वयाची मुलं शालेय जीवनाचा आनंद घेत असताना, विवेक शेअर बाजार समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.

vivek oberoi father suresh oberoi
विवेक ओबेरॉय व त्याचे वडील सुरेश ओबेरॉय (फोटो – इन्स्टाग्राम)

“मी माझ्या पहिल्या कंपनीसाठी तीन मिलियन डॉलर्स निधी उभारला, तेव्हा मी फक्त १९ वर्षांचा होतो. मी माझ्या गुंतवणूकदारांसाठी आणि स्वतःसाठी खूप पैसे कमावले आणि मी २३ वर्षांचा झालो, तेव्हा कंपनी विकली. जर मी इतकी वर्षे मेहनत घेतली नसती तर हे कधीच शक्य झालं नसतं. पण लहानपणापासून व्यवसायातील बारकावे समजून घेतल्यामुळे आता मी भारतीय शेअर बाजारात नऊ कंपन्या घेतल्या आणि मी आणखी चार कंपन्या घेण्याचा विचार करतोय,” असं विवेक ओबेरॉयने नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोर्ब्स इंडियाच्या वृत्तानुसार, एप्रिल २०२५ पर्यंत विवेक ओबेरॉयची एकूण संपत्ती १२०० कोटी रुपये आहे. त्याच्या मालकीच्या आणि गुंतवणूक केलेल्या काही प्रोजेक्ट्समध्ये बीएनडब्ल्यू रिअल इस्टेट, सॉलिटारियो, इम्प्रेसारियो ग्लोबल, रटलँड स्क्वेअर स्पिरिट्स आणि रेडीअसिस्ट यांचा समावेश आहे.