Karishma Kapoor : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरील वादात एक नवीन ट्विस्ट आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या संपत्तीतून वाटा मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान मी त्याची पत्नी आहे तो तुला सोडून गेला होता असं म्हणत प्रिया कपूरने करिश्मा कपूरला सुनावलं आहे.

करिश्माच्या मुलांनी न्यायालयात दाखल केली याचिका

करिश्मा कपूरचे वकील जेठमलानी यांनी संजय कपूरच्या मृत्यूनंतर काही तारखांकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले प्रिया कपूर यांनी सांगितलं होतं की संजय कपूर यांचं कुठलंही मृत्यूपत्र वगैरे नाही. त्यांची काही संपत्ती ट्रस्टकडे आहे. त्यानंतर करिश्मा कपूर आणि प्रिया कपूर यांच्यात एक बैठक पार पडली. चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला ट्रस्टच्या नियमावलीसाठी दिल्लीत एक बैठक होईल. दरम्यान आता करिश्माच्या मुलांनी म्हणजेच २० वर्षीय समायरा आणि १४ वर्षीय कियान यांनी न्यायालयात त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव (आत्ताची प्रिया कपूर) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रियाने वडिलांच्या मृत्यूपत्रात फेरफार केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आता प्रिया कपूर यांच्याकडे संजय कपूर यांच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतच्या सगळ्या संपत्तीचा लेखाजोखा मागितला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे.

प्रिया कपूरने काय बाजू मांडली?

दरम्यान राजीव नायर यांनी प्रिया कपूर यांचा पक्ष न्यायालयापुढे ठेवला. त्यांचं म्हणणं हे आहे की करीश्माला माझ्या पतीने सोडलं होतं. त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. कायदेशीर पत्नी मी आहे. माझं संजयवर खूप प्रेम होतं. करिश्मा आणि संजय घटस्फोटानंतरच्या वाटणीसाठी आणि इतर कायदेशीर गोष्टींसाठी न्यायालयात भांडत होते. करिश्मा संजयने तुला कधीच सोडलं होतं, मी त्याची कायदेशीर पत्नी आहे. २०१६ मध्ये तुमचा संसार मोडला हे विसरलीस का? असा प्रश्न प्रिया यांनी वकिलांमार्फत न्यायालयात उपस्थित केला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

करिश्माच्या मुलांनी केलेल्या याचिकेत काय उल्लेख?

१) संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर प्रिया कपूर यांनी सांगितलं की वडिलांचं कुठलंही मृत्यूपत्र नाही. सगळी संपत्ती RK या कौटुंबिक विश्वस्त मंडळाकडे आहे.

२) २१ मार्च २०२५ ला एक दस्तावेज सादर करण्यात आला आणि ते मृत्यूपत्र असल्याचा दावा करण्यात आला. मात्र हे दस्तावेज खोटे असू शकतात संपत्ती हडपण्याचा हा प्रयत्न आहे.

संजय कपूर यांचा मृत्यू कसा झाला?

संजय कपूर यांचा मृत्यू १२ जून २०२५ ला इंग्लंड या ठिकाणी पोलो खेळताना हार्ट अटॅकमुळे झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांनी घसरले होते. दरम्यान प्रिया कपूर यांनी न्यायालयाला सांगितलं की मी त्यांची कायदेशीर पत्नी आहे. आमच्या दोघांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी होती. तर करिश्मा आणि संजय यांच्यात प्रदीर्घ काळ कायदेशील लढाई झाली.