फिल्मी दुनिया आणि मुंबई शहर यांचं अनोख नातं आपल्याला ठाऊक आहेच. संपूर्ण चित्रपटसृष्टीच या शहरात वसते. याबरोबरच या सगळी स्टार्सना मोठं करण्यात मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर्सचा सिंहाचा वाटा आहे. आता मल्टीप्लेक्स कल्चर जरी वाढलं असलं तरी मुंबईच्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची मजा फारशी कुणीच विसरणार नाही. अशाच एका मुंबईतील चर्चगेट परिसरातील इरॉस थिएटरबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

२०१८ च्या ‘वर्ल्ड हेरिटेज साइट्स’च्या यादीत समाविष्ट झालेले इरॉस थिएटर पाडण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. कित्येक वर्षांपासून उभी असलेली ही वास्तु पाडण्यात येणार असल्याची बातमी समोर येताच कित्येक लोकांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. चित्रपटप्रेमी आणि हाडाचा मुंबईकर ही बातमी ऐकून चांगलेच निराश झाल्याचे सोशल मीडियावर स्पष्ट झाले आहे.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
youth from pune who worked in merchant navy missing
मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरूण बेपत्ता… झाले काय?
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 

आणखी वाचा : जिया खान प्रकरणी निर्दोष मुक्तता होताच सूरज पांचोली सिद्धिविनायकाच्या चरणी; घेतला बाप्पाचा आशीर्वाद

काही बॉलिवूड कलाकारांनीही याबद्दल सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. ‘इरॉस सिनेमा’चे काही जुने फोटोज बॉलीवूडचे लेखक-संपादक अपूर्व असरानी यांनी शेअर करताना लिहिले, “हे खूप हृदयद्रावक आहे. हे दक्षिण बॉम्बे आर्ट डेको लँडमार्क, १९३८ मध्ये बांधले गेले होते, जिथे मी कॉलेज बंक करून चित्रपट पाहिले, माझी पहिली डेटही इथेच होती, इथेच माझा पहिला चित्रपट ‘सत्या’ १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. मुंबईला आपल्या हेरिटेज वास्तू जतन करता येत नाहीत याचा खेद वाटतो.”

आणखी वाचा : Dhoom 4 Update : ‘पठाण’च्या यशानंतर YRF च्या ‘धूम ४’बद्दल मोठी अपडेट; जॉन अब्राहम साकारणार नकारात्मक भूमिका

पाठोपाठ अभिनेता आणि कॉमेडीयन वीर दास आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीदेखील अपूर्व असरानी यांची पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करताना वीर दास म्हणाला, “त्यावेळी मी सीएनबीसीमध्ये नोकरी करायचो, तेव्हा मी ‘रंग दे बसंती’ या चित्रपटगृहात पाहिला होता. चित्रपटगृहातून बाहेर पडताना मी अभिनय क्षेत्रात यायचं ठरवलं आणि ऑडिशन द्यायला सुरुवात केली.”

तर विवेक अग्निहोत्री आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “जेव्हा जेव्हा कोणतंही सिंगल स्क्रीन थिएटर पाडलं जातं तेव्हा तेव्हा माझ्या बालपणीची एक एक आठवण नष्ट होत असते. माझे ४ चित्रपट इथे लागले, मी स्वतः इथे भरपुर चित्रपट पाहिले आहेत. पण काळाप्रमाणे होणारा बदल आणि व्यावहारिकता मला समजतात.”

इरॉस थिएटर २०१७ मध्ये बंद करण्यात आले होते. मीडिया रीपोर्टनुसार त्या इमारतीच्या जागी एक मोठा मॉल बनवण्यात येणार आहे. यापूर्वी चंदन सिनेमा, इंपीरियल सिनेमा, रॉयल सिनेमा, नोवेल्टी सिनेमा अशी बरीच चित्रपटगृह बंद करण्यात आलेली आहेत. ‘इरॉस’ पाडण्याबद्दल अजूनही बऱ्याच ठिकाणी संभ्रम बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर पसरवली जाणारी ही अफवा आहे आणि तिथे फक्त नूतनीकरणाचे काम सुरू आहे असंही सांगण्यात येत आहे. याबद्दल पुष्टी अजूनही करण्यात आलेली नाही.