लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी हिंदी आणि उर्दूबद्दलचे काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. एक भाषा हिंदूंची आणि दुसरी मुस्लिमांची आहे असं मानणं चुकीचे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. भाषा ही धर्मातून नव्हे तर प्रदेशातून निर्माण होते आणि उर्दू ही हिंदीइतकीच हिंदुस्थानी भाषा आहे, असंही त्यांनी नमूद केलं. उर्दू लिपी पुसून टाकल्याबद्दल वर्षानुवर्षे सरकारांना दोष देणं चुकीचं आहे, कारण जे लोक स्वतःला आपल्या संस्कृतीचे संरक्षक मानतात त्यांनी तरुण पिढीला हे ज्ञान देण्याचं काम केलेलं नाही, असं स्पष्ट मत जावेद अख्तर यांनी मांडलं.

एका कार्यक्रमातील चर्चेदरम्यान जावेद अख्तर म्हणाले, “सुमारे २०० वर्षांपूर्वीपर्यंत हिंदी आणि उर्दू भाषा समान होत्या, नंतर राजकीय कारणांमुळे या भाषा वेगळ्या झाल्या. काही कविता या हिंदी कवीने लिहिल्यात की उर्दू कवीने लिहिल्या असतील हे सांगता येणार नाही, अशा आहेत. उत्तर भारतात सांस्कृतिक फरक निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी हे केलं होतं.”

‘या’ अभिनेत्याला घाबरून रडू लागलेली माधुरी दीक्षित, चित्रपट करण्यास दिलेला नकार; स्वत: खुलासा करत म्हणाले, “मी तिला स्पर्श…”

ते पुढे म्हणाले, “लोक म्हणतात की उर्दू ही मुस्लीम भाषा आहे. खरंच? पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानातील १० कोटी बंगाली लोकांचे काय? वैकोम मुहम्मद बशीरसारखे मल्याळम दिग्गज ते उर्दूमध्ये लिहित होते का? मिडल-इस्टमधील सर्व अरब उर्दू बोलतात का? उझबेकिस्तान, कझाकस्तानमधील लोक उर्दू कुठे बोलतात? ७० वर्षांपूर्वी आपण वेगळे झालो होतो हे खरंय, पण ते हिंदुस्थानचेच होते, नाही का?”

१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…

जावेद अख्तर म्हणाले, “हिंदी ही हिंदूंची भाषा आहे असं म्हणणंही तितकंच चुकीचं आहे. हिंदी ही हिंदूंची भाषा आहे, असं म्हणतात. मग तुम्ही हे जाऊन तमिळनाडूतील लोकांना का सांगत नाही? बघूया काय होते ते. हा सर्व मूर्खपणा आहे. भाषा ही धर्माची असू शकत नाही. भाषा त्या त्या प्रदेशांची असते. इंग्रजी ही ख्रिश्चनांची भाषा आहे का? नाही. फ्रान्स आणि इटलीमधील ख्रिश्चन इंग्रजी बोलतात का?” असा सवाल त्यांनी केला.

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे जावेद अख्तर म्हणाले की उर्दू ही उत्तर भारतीय भाषा आहे. जमीन विभागली जाऊ शकते, मात्र भाषा विभागली जाऊ शकत नाही. “तुम्ही असं म्हणू शकत नाही की आमच्याकडे संज्ञा असतील, तुमच्याकडे क्रियापदं ठेवा, तुम्ही असं करू शकता का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.