ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता त्यांनी आपलं पहिलं लग्न मोडण्याचं कारण सांगितलं आहे. त्याचं पहिलं लग्न हनी इराणींशी झालं होतं. ११ वर्षांचा संसार दारूच्या व्यसनामुळे मोडला, असं जावेद अख्तर यांनी सांगितलं.

‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “माझं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या ११ वर्षानंतर आमचा घटस्फोट झाला. मुस्लीम पर्सनल लॉनुसार मी तिला चार महिन्यांसाठी पोटगी द्यायची होती, पण ती माझी जबाबदारी होती. तिला माझी मदत हवी आहे की नाही ही याचा निर्णय तिला घ्यायचा होता. काही पुस्तकं आणि काही कपडे घेऊन मी घराबाहेर पडलो. ती खूप स्वाभिमानी होती, त्यामुळे तिला मदत हवी असेल, नसेल तरी मी मदतीसाठी उपलब्ध आहे, याची खात्री केली. आता आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.”

“रणदीप हुड्डाने खूप…”, आजोबांवरील ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणजीत सावरकर यांची प्रतिक्रिया

दारूच्या व्यसनाचा आपल्या पहिल्या लग्नावर कसा परिणाम झाला, याबाबत त्यांनी सांगितलं. “मी वयाच्या २०-२१ व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली आणि मी ४२ वर्षांचा झाल्यावर दारू सोडली. त्या काळी मला एक बाटली घेणं परवडत होतं आणि मी रोज रात्री एक बाटली प्यायचो. उर्दू कवींसाठी दारू पिणं मोठी गोष्ट नाही. जर कोणी कवी वा कलाकार असतील तर त्यांनी निश्चिंत राहण्यासाठी दारू प्यायला ही, असं मानलं जातं. आता मला वाटतं की मी चुकीच्या गोष्टी मानत होतो,” असं जावेद अख्तर म्हणाले.

“आम्हाला धर्माची पर्वा नव्हती,” २२ वर्षांपूर्वी मोडलेल्या लग्नाबाबत विंदू दारा सिंगचे विधान; तब्बूच्या बहिणीशी झाला होता विवाह

“मी लखनऊमध्ये शिकलेल्या शिष्टाचारामुळे कधीच अपशब्द वापरायचो नाही, त्यामुळे बराच कडवटपणा माझ्यात साचला होता. दारू प्यायल्यावर मी कशाचाही विचार न करता असभ्य भाषा वापरायचो, शिव्या द्यायचो. मी दुसरीच व्यक्ती बनायचो. खरं तर तसं वागणं चांगलं नव्हतं. माझ्या वागण्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होत होता, याचा परिणाम हनीसोबतच्या माझ्या लग्नावर झाला. मी एक संयमी आणि जबाबदार व्यक्ती असतो तर कदाचित आज गोष्ट वेगळी असती,” असं ते म्हणाले.

“तिने मला जवळ ओढलं अन्…”, विजय वर्माने सांगितला सारा अली खानसोबत इंटिमेट सीन करण्याचा अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतरही आपण जवळपास १० वर्ष दारू प्यायलो, पण असंच पित राहिल्यास लवकरच मरू, अशी जाणीव झाल्याने ४२ व्या वर्षी दारू सोडली, असं जावेद अख्तर यांनी सांगितलं.