शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून दमदार कमाई करत आहे. सहा दिवसानंतरही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाने पाचव्या दिवशीच ३०० कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला होता, त्यानंतर आता सहाव्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.

‘जवान’ची दमदार कमाई, पाच दिवसांत गाठला ३०० कोटींचा टप्पा; पण मोडता आला नाही ‘गदर २’ चा ‘हा’ रेकॉर्ड

या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५३.२३ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ७७.८३ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ८०.१ कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी ३२.९२ कोटी रुपये कमावले. यासह हा चित्रपट रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार करणारा चित्रपट ठरला आहे. आता ‘जवान’ रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत, त्यानुसार शाहरुख खानच्या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे.

“त्यांना वाटत असेल की मी…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘जवान’ ने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी २६.५० कोटी रुपयांची अंदाजे कमाई केली आहे. यानंतर ६ दिवसात ‘जवान’ची एकूण कमाई आता ३४५.५८ कोटी रुपये झाली आहे. दुसरीकडे, जागतिक स्तरावर ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा टप्पा आधीच ओलांडला आहे, असं ट्रेड एक्सपर्ट रमेश बाला यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात त्याचे पाच लूक पाहायला मिळतात. त्याशिवाय नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरीजा ओक, रिद्धी डोग्रा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन दक्षिणेतील आघाडीचा दिग्दर्शक अॅटलीने केलं आहे.