सासू-सुनेच्या नात्यात थोडेफार वाद असणं किंवा भांडणं होणं खूपच सामान्य बाब आहे. मग ते सामान्य कुटुंब असो किंवा मग बॉलिवूड सेलिब्रेटी. जिथे सासू-सून एकत्र असतील तिथे थोडी फार तक्रार होणं सहाजिक आहे. मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याचं तसेच या दोघांमध्ये सगळं काही ठीक नसल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. अशात या नात्यावर आता स्वतः जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जया बच्चन यांनी खुलासा केला की त्यांना ऐश्वर्याची एखादी गोष्ट न आवडल्यास त्या तिला खूप बोलतात आणि खूप वेळा नाटकही करतात. जया बच्चन म्हणाल्या, “ऐश्वर्याची एखादी गोष्ट मला आवडली नाही तर मी तिला ते सरळ स्पष्ट भाषेत बोलून टाकते. मी तिच्या पाठीमागून कोणतही राजकारण करत नाही.”

आणखी वाचा- अमेरिकेत होणार राम चरणच्या बाळाचा जन्म? पत्नी उपासनाने चर्चांवर सोडलं मौन

जया बच्चन पुढे म्हणाल्या, “ऐश्वर्या माझ्यासाठी मैत्रिणीसारखी आहे. फक्त एवढाच फरक आहे की मी जरा जास्त नाटक करते आणि तिने माझा जास्त आदर करावा कारण मी वयाने तिच्यापेक्षा मोठी आहे. एवढंच त्यामागे कारण असतं. बाकी काहीच नाही. आम्हाला दोघींना घरात बसून वायफळ गप्पा मारायला आवडतं. अर्थात तिच्याकडे फार कमी वेळ असतो. पण ती जे काही करते ते आम्ही एन्जॉय करतो. माझं तिच्याबरोबर खूप चांगलं नातं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने त्याची आई आणि ऐश्वर्या यांच्या नात्यावर भाष्य केलं होतं. अभिषेक म्हणाला होता, “आई आणि ऐश्वर्या माझ्याविरोधात गँग बनवतात आणि दोघीही बंगाली भाषेत बोलतात. आई बंगाली आहे त्यामुळे तिला ही भाषा येते आणि ऐश्वर्या ‘चोखेर बाली’च्या वेळी बंगाली शिकली होती. त्यामुळे जेव्हाही त्यांना माझ्याविरोधात बोलायचं असतं तेव्हा त्या दोघी बंगालीत बोलतात.”