राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बर हिने रक्षाबंधनाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंबरोबर तिने लिहिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. दरवर्षी जुही सावत्र भाऊ प्रतीक बब्बरला राखी बांधते, पण यंदाच्या रक्षाबंधनला प्रतीक बब्बर कुटुंबाबरोबर नव्हता, त्याबद्दलच जुहीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

जुहीने भाऊ आर्य बब्बर व कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यात ती भाऊ आर्यला राखी बांधताना दिसतेय. तसेच कुटुंबातील इतर सदस्यही त्यांच्याबरोबर दिसतात. पण या फोटोंमध्ये प्रतीक बब्बर नव्हता. याबद्दल जुहीने काय म्हटलं? ते पाहुयात.

“काही सेलिब्रेशन्स पूर्ण असतात… तर काही अपूर्ण वाटतात.

आज रक्षाबंधन आहे, आणि आनंद होत असतानाही, माझ्या हृदयाचा एक भाग मिसिंग आहे.

पण आयुष्य पुढे सरकत राहतं… आणि रक्ताच्या नात्यांमध्ये काहीच बदलू शकत नाही,” असं जुहीने लिहिलं.

जुही बब्बरने उल्लेख केला नसला तरी तिची ही पोस्ट प्रतीक या सेलिब्रेशनमध्ये अनुपस्थित असल्याबद्दल आहे. दरवर्षी जुही आर्य व प्रतीक यांना राखी बांधते. तिन्ही भावंडं एकत्र येऊन हा सण साजरा करतात, पण यंदा मात्र प्रतीक जुही व आर्यबरोबर नाहीये.

जुही बब्बरची पोस्ट-

प्रतीक व बब्बर कुटुंबात दुरावा

प्रतीक बब्बरने या वर्षाच्या सुरुवातीला त्याचं नाव अधिकृतपणे बदलून प्रतीक स्मिता पाटील असं केलं. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रतीकने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. पण या लग्नाचं निमंत्रण त्याने बब्बर कुटुंबाला दिलं नव्हतं. वडील राज बब्बर यांनाही लग्नाला बोलावलं नव्हतं. यामुळे सावत्र भाऊ आर्य बब्बरने नाराजी व्यक्त केली होती. भावंडं व आईला नाही, पण किमान वडिलांना प्रतीकने लग्नाला बोलवायला हवं होतं, असं तो म्हणाला होता.

प्रतीकने बब्बर कुटुंबाला लग्नात का बोलावलं नाही, याबद्दल फार बोलणं टाळलं. मात्र, आपल्याला वडिलांसारखं नाही तर आईसारखं व्हायचंय, दिवंगत आईशी जोडलेलं राहायचंय, त्यामुळे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच माझ्यासाठी जे लोक महत्त्वाचे आहेत, त्यांनाच लग्नात बोलावलं, असं प्रतीक एका मुलाखतीत म्हणाला होता.