अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. लवकरच तिचा ‘तेजस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रवास करत असताना विमानात कंगनाची भेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी झाली. कंगनाने या भेटीचा सेल्फी शेअर केला आहे.

वनाधिकाऱ्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातून स्पर्धकाला केली अटक, ‘ते’ पेंडंट ठरलं कारणीभूत

मुंबई ते दिल्ली या प्रवासादरम्यान कंगनाला विमानात अजित डोवाल भेटले, जे तिच्या शेजारच्या सीटवर बसले होते. कंगना रणौतने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी अचानक झालेल्या या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याबरोबरच तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर करत अजित डोवाल यांना भेटल्याचा आनंदही व्यक्त केला.

“काय नशीब आहे, आज सकाळी विमान प्रवासात मला श्री अजित डोवाल जी यांच्या शेजारी बसायला मिळाले. खरं तर ‘तेजस’चे (आमच्या सैनिकांना समर्पित चित्रपट) प्रमोशन करताना प्रत्येक सैनिकाची प्रेरणा असलेल्या सरांना मला भेटायला मिळाले. मी हे एक खूप चांगले शगुन मानते, जय हिंद,” असं कंगनाने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कंगना रणौत मुंबईहून दिल्लीला एका खास कामासाठी गेली आहे. ती लव कुश रामलीलामध्ये रावण दहन करणार आहे. इतकंच नाही तर कंगना ही कामगिरी करणारी पहिली बॉलीवूड अभिनेत्री आहे.