बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत अभिनयासह तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती अनेक विषयांवर तिची मते मांडत असते. लवकरच तिचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. कंगना नेहमीच राजकीय विषयांवर आपले मत मांडत असते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने राजकीय प्रवेशाबाबत वक्तव्य केले आहे.

कंगनाने याअगोदर अनेकदा राजकारणात येण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंगनाने राजकीय प्रवेशाबाबत मत व्यक्त केले होते. ती म्हणाली होती “जर भगवान कृष्णाची इच्छा असेल, तर मी लोकसभा निवडणूकही लढवेन.”आता नुकत्याच एका मुलाखतीत कंगनाने पुन्हा एकदा राजकीय प्रवेशाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
Sudhir Mungantiwar reacts on social media trolling about controversial statement against congress
“काँग्रेसविरोधात मी असाच बोलत राहणार,” सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाषणाचा अर्धवट व्हिडिओ…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
kiran mane post for uddhav thackeray
“त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ केलं नाही,” उद्धव ठाकरेंबद्दल अभिनेत्याची पोस्ट; म्हणाले, “काळाची पावलं…”

हेही वाचा- “सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स तोट्यात”, बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचं मोठं विधान

नुकतेच कंगनाने ‘टीव्ही ९’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या राजकीय प्रवेशाबाबत खुलासा केला आहे. कंगना म्हणाली, “अनेक चित्रपटांच्या सेटसाठी मी राजकीय पक्षांशी लढले आहे. मला माझ्या देशासाठी जे करायचं आहे, ते करायला जागा मिळत नाही. पण, मला राजकारणात यायचं असेल, तर कदाचित हीच योग्य वेळ आहे, असं मला वाटतं. या देशानं मला खूप काही दिलं आहे आणि ते परत देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी राष्ट्रप्रेमी आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीतूनही ही भावना दिसून येते. मला लोकांकडून खूप प्रेम मिळतं आणि माझं कौतुकही केलं जात, असं मला वाटतं.”

काही दिवसांपूर्वीच कंगनाने राजकारणात प्रवेश करण्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, त्यात तिने लिहिले होते, “मी खूप संवेदनशील आणि समजूतदार व्यक्ती आहे. मी राजकीय व्यक्ती नाही. मला राजकारणात येण्यासाठी अनेक वेळा विचारण्यात आले; पण मी राजकारणात प्रवेश केला नाही.”

हेही वाचा- दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई वयाच्या पन्नाशीत देणार बाळाला जन्म, पुढच्या महिन्यात पाळणा हलणार!

सोशल मीडियावर कंगना मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ व फोटो पोस्ट करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. गेल्याच महिन्यात म्हणजे २२ जानेवारीला कंगनाने अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती. एवढेच नाही, तर अयोध्येतील एका मंदिरात ती झाडू मारतानाही पाहायला मिळाले होते. या सोहळ्यादरम्यानचे तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.