Tejas Box Office Collection : कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीयेत. २७ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. या १० दिवसांत चित्रपट ५ कोटींच कमवू शकला आहे. चित्रपटाची ओपनिंगच निराशाजनक झाली होती. त्यानंतर पहिल्या वीकेंडमध्ये कमाई वाढेल, असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. दुसऱ्या वीकेंडपर्यंत तर चित्रपटाने गाशा गुंडाळला आहे.

अवघ्या तीन वर्षांत मोडलं पहिलं लग्न, अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

बॉक्स ऑफिसवर ‘तेजस’ची अवस्था खूपच वाईट आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता तो बजेटच्या १० टक्केही कमवू शकलेला नाही. खरं तर पहिल्या दिवशीच प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी खूप संघर्ष करत आहे. पहिल्या दिवशी १.२० कोटी कमावणाऱ्या या चित्रपटाने दुसर्‍या शुक्रवारी फक्त ८ लाख रुपये कमावले, त्यानंत ९ व्या दिवशी १२ लाख आणि १० दिवशी ११ लाख रुपये कमावले आहेत.

‘शार्क टँक इंडिया 3’ मध्ये दिसतील १२ शार्क, अश्नीर ग्रोव्हरने उडवली खिल्ली; म्हणाला, “या शोचा दर्जा…”

१० दिवसानंतर ‘तेजस’ची एकूण कमाई ५.८१ कोटी झाली आहे. हा चित्रपट भारतात १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. कंगनाने सिनेमाचं खूप प्रमोशन केलं होतं, पण आगाऊ बुकिंगमध्ये याला फटका बसला होता, त्यामुळेही चित्रपटाची कमाई कमी झाली. या सिनेमाचं बजेट ४५ कोटींच्या जवळपास असल्याचं म्हटलं जातंय, ते पाहता एकूण कलेक्शन खूप कमी आहे. चित्रपटाच्या कमाईमुळे कंगनाला मोठा फटका बसला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तेजस’ हा चित्रपट लढाऊ विमानांवर आधारित आहे. यामध्ये कंगना रणौतने हवाईदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तिच्याशिवाय सिनेमात अंशुल चौहान, वरुण मित्र, आशिष विदयार्थी आणि विशाख नायर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.