Karan Johar Get’s Trolled For Praising Saiyaara Fame Ahaan Panday : करण जोहर बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. त्याने आजवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. करण सोशल मीडियावरही सक्रिय असून अनेकदा चित्रपट व कलाकारांबद्दल तो बोलताना दिसतो. अशातच त्याने नुकतीच ‘सैयारा’ चित्रपटासंबंधित सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. परंतु, यामुळे त्याला नेटकऱ्याने ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं.

करण जोहरने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, करणने ट्रोल करणाऱ्याला स्पष्ट उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं. करणने सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या ‘सैयारा’ चित्रपटासंबंधित पोस्ट शेअर केली आहे. यामधून त्याने चित्रपट पाहिल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

करणने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये असलेल्या कलाकारांचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, “अहान तू तुझ्या पदार्पणातील चित्रपटात खूप छान काम केलं आहेस, तुझ्या डोळ्यातील भाव मनाला भिडणारे होते. तुझा चित्रपटसृष्टीतील या पुढचा प्रवास पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. अनित, तू खूप सुंदर दिसतेस. खूप प्रेमळ आहेस. तुझं चित्रपटातील काम पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. अहान व तू तुम्ही दोघांनीही खूप छान काम केलं आहे.”

करणच्या या पोस्टखाली एका नेटकऱ्याने ‘आ गया नेपोकिडका दायजान’ अशी कमेंट केली होती. परंतु, करणने या नेटकऱ्याला, “गप्प बस, घरी बसल्या बसल्या नकारात्मकता पसरवू नकोस. दोन मुलांचं काम बघ आणि स्वत:पण काहीतरी काम कर”, असं स्पष्ट उत्तर दिलं आहे.

करण जोहरच्या पोस्टखालील कमेंट

करणने या पोस्टमधून चित्रपटातील कलाकारांसह दिग्दर्शक, निर्मात्यांचंही कौतुक केलं आहे. करण म्हणाला, “मी शेवटचा कोणता चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं हे आठवत नाही. डोळ्यात अश्रू आणि आनंद अशा दोन्ही भावना मी अनुभवत आहे. मला अभिमान वाटतोय की लव्ह स्टोरीवर आधारित चित्रपटाने देशभरातील सगळ्यांना प्रेमात पाडलं आहे. यशराज प्रोडक्शनने पुन्हा एकदा एका चांगल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करण पुढे म्हणाला, “आदित्य चोप्रा आय लव्ह यू, मला अभिमान आहे की मी यशराज प्रोडक्शनचा विद्यार्थी आहे. अक्षय्ये विधिनी एका कमाल चित्रपटाची निर्मिती करत तुम्ही निर्माता म्हणून पदार्पण केलं आहे. अभिनंदन. सैयारा हा मोहित सुरीच्या आयुष्यातीलएक उत्कृष्ट चित्रपट आहे. तू कमाल चित्रपट बनवला आहेस. म्युझिक खूप कमाल आहे.”