Sunjay Kapur third wife Priya Sachdev Photos : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचे १२ जून रोजी निधन झाले. त्यांच्यावर १९ जूनला दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर रविवारी (२२ जून रोजी) त्यांची प्रार्थना सभा दिल्लीत ठेवण्यात आली होती. करिश्मा कपूर, तिची मुलं समायरा व कियान तसेच तिची बहीण करीना कपूर, सैफ अली खान हे सर्वजण रविवारी संजय कपूर यांच्या प्रार्थना सभेला उपस्थित राहिले.

संजय कपूर यांची प्रार्थना सभा दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आली होती. बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया संजय यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आली होती. संजय कपूर यांच्या प्रार्थना सभेतील काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटोंमध्ये करिश्मा तिच्या पतीची तिसरी बायको प्रिया सचदेवबरोबर दिसत आहे. तसेच काही व्हिडीओंमध्ये करीना कपूर भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं.

करिश्मा, तिची मुलं व सैफ-करीना संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीला गेले होते. तिथे वडिलांचं पार्थिव पाहून करिश्माच्या मुलाला अश्रू अनावर झाले होते. करिश्मा व करीना त्याला सांभाळताना दिसल्या होत्या. तसेच करिश्माही संजय यांना अखेरचा निरोप देताना प्रिया सचदेवला मिठी मारून रडली होती. आता प्रार्थना सभेतही करिश्मा प्रियाबरोबर दिसली.

पाहा पोस्ट-

संजय कपूर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव नंदिता महतानी होतं. चार वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला होता. करिश्मा कपूर ही संजय कपूर यांची दुसरी पत्नी होती. दोघांनी २००३ साली लग्न केलं आणि २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करिश्मा व संजय यांनी घटस्फोट घेताना एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. संजय यांनी हनिमूनला मित्रांबरोबर रात्र घालवायला जबरदस्ती केली होती, असा धक्कादायक दावा करिश्माने केला होता. तसेच संजय यांनी मारहाण केल्याचाही आरोप तिने केला होता. दुसरीकडे, करिश्माने पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं, असं संजय म्हणाले होते.

संजय कपूर यांनी करिश्माला पोटगीत ७० कोटी रुपये दिले होते. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी प्रिया सचदेवशी लग्न केलं. प्रियाला संजयपासून एक मुलगा आहे. घटस्फोटानंतरही संजय करिश्मापासून असलेल्या दोन्ही मुलांबरोबर सण-उत्सव साजरे करायचे. त्यांचा वाढदिवसही सेलिब्रेट करायचे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय कपूर हे देशातील नामांकित उद्योजक होते. ते सोना कॉमस्टारचे चेअरमन होते. त्यांची एकूण संपत्ती १०,३०० कोटी रुपये आहे.