‘भूल भुलैया २’ नंतर कियारा व कार्तिकची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाली आहे. कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ प्रदर्शनासाठी तयार आहे. या चित्रपटात गुजराती असलेल्या सत्यप्रेम आणि कथा यांची एक अनोखी प्रेमकहाणीही पाहायला मिळणार आहे.

२९ जून रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे अडवांस बूकिंग सुरू झाले असून प्रेक्षक या चित्रपटासाठी प्रचंद उत्सुक असल्याचं स्पष्ट झालं आहे. ट्रेड एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार ‘सत्यप्रेम की कथा’मुळे आधीच निराशाजनक कामगिरी करणाऱ्या ‘आदिपुरुष’ला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : OTT प्लॅटफॉर्म्स ‘द केरला स्टोरी’ चित्रपट विकत न घेण्यामागे ‘हे’ आहे कारण; खुद्द निर्मातेच ठरलेत निमित्त

‘आदिपुरुष’च्या एकूणच कमाईचे आकडे पाहता याचा फायदा कार्तिक-कियाराच्या या चित्रपटाला होऊ शकतो असंही म्हंटलं जात आहे. ‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट २००० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. यामुळेच हा चित्रपट पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करू शकतो असं म्हंटलं जात आहे.

चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणी लोकांना पसंत पडली आहेत. त्यामुळे ‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार पहिल्याच दिवशी ‘सत्यप्रेम की कथा’ ६.५ ते ७.५ कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली गेली आहे. ईदची सुट्टी अन् नंतर लागून आलेला वीकेंड याचा या चित्रपटाला चांगलाच फायदा होईल असं म्हंटलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिक व कियाराची जोडी यापूर्वी ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसली होती. तेव्हा प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सत्यप्रेम व कथा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सने केलं आहे.