अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कार्तिक-कियाराचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. चित्रपटाचे प्रमोशन करताना कियारा अनेकदा तिचा नवरा सिद्धार्थ मल्होत्रा आणि तिच्या सासूचे कौतुक करताना दिसली.

हेही वाचा : सुप्रसिद्ध बॉलीवूड निर्माती दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन; भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “तुझ्यापोटी माझा जन्म…”

‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीतकियारा अडवाणीने तिची सासू रिमा मल्होत्रा यांना पाणीपुरी आवडत असल्याचा उल्लेख केला आहे. अभिनेत्रीला “तुला पाणीपुरी खूप जास्त ओव्हररेटेड वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला.” यावर कियारा म्हणाली, “मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे मिळणारे पाणीपुरीचे सगळे प्रकार मला खूप जास्त आवडतात.”

हेही वाचा : “रिजेक्शन, नकार यामुळे जीवनात…” आयुष्यमान खुरानाने केला संघर्षाच्या दिवसांबद्दल खुलासा

पाणीपुरीबाबत खास आठवण सांगताना अभिनेत्री म्हणाली, “माझ्या सासूबाई सध्या मुंबईत आमच्याकडे राहायला आल्या आहेत. पहिल्याच दिवशी मी त्यांना पाणीपुरी बनवून इम्प्रेस केले .” पुढे तिला “तुमच्या लग्नात पाणीपुरीचा स्टॉल होता का?” असा प्रश्न विचारण्यात आला यावर कियारा म्हणाली, “हो…कारण माझ्या सासूबाईंना पाणीपुरी प्रचंड आवडते. आताच त्या दिल्लीहून मुंबईत आल्या आहेत. मला पहिल्या दिवसापासून माहित होते की, त्यांना पाणीपुरी किती आवडते. मी त्यांना म्हणाले, आज आपण घरी पाणीपुरी बनवूया, त्यांना असा मस्का लावला की… (जो मस्का लगाया) मला माहिती होतं हे ऐकल्यावर त्या खूप आनंदी होणार”

हेही वाचा : “माय हॉटी…” रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न केले. जैसलमेरला सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या प्रीमियरला सिद्धार्थ-कियाराने जोडीने हजेरी लावली होती.