scorecardresearch

लग्नात कियाराच्या ‘कलिरें’नी वेधलं सर्वांचं लक्ष, सिद्धार्थ मल्होत्राशी आहे खास संबंध

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची सोशल मीडियावर आहे चर्चा

sidharth malhotra kiara advani delhi reception, sidharth kiara reception party in mumbai, sidharth kiara reception party in delhi, sidharth kiara mumbai reception party, sidharth kiara mumbai reception, sidharth kiara fly to delhi, कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, सिद्धार्थ कियारा लग्न
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ७ फेब्रुवारीला सप्तपदी घेतली. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ-कियारा मोजका मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नाच्या बेडीत अडकले. राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नात कियारा खूपच सुंदर दिसत होती. दोघांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण या सगळ्यात कियाराच्या कलिरेंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

कियारा अडवाणीच्या कलिऱ्यांमध्ये सिद्धार्थ आणि तिची क्यूट लव्हस्टोरी गुंफलेली आहे. या कलिऱ्यांमध्ये केवळ एकच नाही तर तीन खास गोष्टी आहेत. ज्या सिद्धार्थशी संबंधित आहेत. कियाराच्या या कलिरेंची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा- कियारा अडवाणीच्या मंगळसूत्राच्या डिझाइनची सोशल मीडियावर चर्चा, पाहा यामध्ये काय आहे खास?

कियारा अडवाणीच्या कलिऱ्यांमध्ये तिच्या आणि सिद्धार्थच्या नावांचे इनिशियल्स आहेत. जे या दोघांचं नातं खूप घट्ट असल्याचं दर्शवतात. कियाराने या कलिरेंच्या माध्यांमातून सिद्धार्थच्या खूप जवळच्या एका सदस्याला ट्रिब्यूट दिला आहे. आज तो या जगात नाही. कियाराने सिद्धार्थचा पाळीव श्वान ऑस्करचा चेहरा अत्यंत मोहक पद्धतीने या कलिऱ्यांमध्ये कोरून घेतला आहे. कियाराच्या या कलिरेंचं डिझाइन मृणालिणी चंद्राने केलं होतं.

सिद्धार्थचं त्याचा पाळीव श्वान ऑस्करशी खूप खास नातं होतं. ११ वर्ष तो सिद्धार्थबरोबर होता. मात्र फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याचं निधन झालं. त्यावेळी सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. याचबरोबर त्याने ऑस्करचे काही फोटोही शेअर केले होते. ऑस्कर सिद्धार्थसाठी किती महत्त्वाचा होता हे कियाराला माहीत असल्याने तिने आपल्या कलिरेंच्या माध्यामातून त्याचा अशी श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा- दुसऱ्या पत्नीला घरी घेऊन आलेले सलीम खान, काय होती सलमानच्या आईची प्रतिक्रिया?

याशिवाय रोम हे सिद्धार्थ आणि कियाराचे आवडते डेस्टिनेशन आहे आणि तेही कलिरेंमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कियाराच्या लेहंग्यातही रोमची झलक पाहायला मिळाली. दरम्यान सिद्धार्थ आणि कियारा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्याने कधीच आपल्या नात्यावर उघडपणे भाष्य केलं नाही. दोघांमध्ये काहीतरी आहे, याची पुष्टी करण जोहरच्या चॅट शोमध्ये झाली होती. त्यामुळे करण जोहर सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीचा मॅचमेकर बनल्याचे बोललं जातं. करणने कियारा आणि सिद्धार्थ यांना लग्नाबद्दल शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली तेव्हा त्याने दोघांच्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 18:20 IST
ताज्या बातम्या