scorecardresearch

Video : दमदार अ‍ॅक्शन, रोमान्स अन् सलमानचा खास लूक; ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर प्रदर्शित

हा चित्रपट २०२३ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

Video : दमदार अ‍ॅक्शन, रोमान्स अन् सलमानचा खास लूक; ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर प्रदर्शित
किसी का भाई किसी की जानचा टीझर प्रदर्शित

चित्रपटप्रेमींसाठी आजचा दिवस फारच आनंदाचा ठरणार आहे. कारण आज अभिनेता शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची झलकही पाहायला मिळाली. त्यानंतर याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले होते. त्यातच आता सलमानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर सध्या चांगलाच चर्चेत आहे.

सलमान खानचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला. याची सुरुवातच अॅक्शनने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच अभिनेत्री पूजा हेगडेची एंट्री होते आणि त्यांच्यात रोमान्स पाहायला मिळतो. त्याबरोबरच दुसरीकडे सलमान हा काही गुंडांना मारहाण करताना दिसत आहे. याच दरम्यान ‘सही का होगा सही, गलत का गलत।’ असा डायलॉग ऐकायला मिळत आहे.
आणखी वाचा : “मला सांगायला आवडेल की…” कियाराशी लग्न करण्याबद्दल सिद्धार्थ मल्होत्राने सोडलं मौन

तर दुसरीकडे या चित्रपटात सलमानचा एक वेगळाच लूक पाहायला मिळणार आहे. यावेळी सलमान हा वाढवलेले केस आणि दाढी या अवतारात पाहायला मिळत आहे. यावेळी पूजा ही त्याला त्याचे नाव विचारते. तेव्हा तो म्हणतो, ‘माझे काहीही नाव नाही. पण मला भाईजान या नावाने ओळखले जाते।’

या चित्रपटातील एका सीनमध्ये सलमान खानबरोबर शहनाझ गिल, राघव जुयाल, पलक तिवारी यांसह व्यंकटेश आणि जगपती बाबू यांचीही झलक पाहायला मिळत आहे. याचा शेवटचीही छान दमदार अॅक्शन सीनने होत आहे.

आणखी वाचा : “वेड चित्रपटासाठी…” ‘सरला एक कोटी’ला स्क्रिन्स आणि प्राईम टाईम शो न मिळाल्याने ईशा केसकर संतापली

या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. तर सलमान खान हा स्वत: या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे, दग्गुबती व्यंकटेश, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, जस्सी गिल आणि पलक तिवारी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यात दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२३ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 16:54 IST

संबंधित बातम्या