Know about Aaradhya Bachchan School fees: बॉलीवूडचे कलाकार जितके चर्चेत असतात, तितकीच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा होताना दिसते. अनेकदा त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते.
आपल्या आवडत्या कलाकारांची मुले काय करतात, कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेतात, ती किती वर्षांची आहेत आणि इतर बऱ्याच गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. आज आपण आराध्या बच्चनबाबत काही गोष्टी जाणून घेऊ…
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची लेक ‘या’ शाळेत घेतेय शिक्षण
बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्या तिच्या आईबरोबर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. अनेक छोट्यापासून ते मोठ्या कार्यक्रमांना आराध्या ऐश्वर्याबरोबर दिसते. त्यामुळे ऐश्वर्याबरोबरच तिच्या लेकीचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते.
आज आराध्याचा वाढदिवस आहे. तिचा जन्म १७ नोव्हेंबर २०११ ला झाला. ती आता १४ वर्षांची आहे. आराध्या बच्चन मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. या शाळेत आराध्याबरोबरच इतर बॉलीवूड कलाकारांची मुलेदेखील शिक्षण घेत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, सध्या आठवीत शिक्षण घेत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आराध्याची शाळची प्रत्येक महिन्याची फी ही ४.५ लाख इतकी आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये नर्सरी ते ७ वी पर्यंतच्या वर्गांसाठी महिन्याची फी ही अंदाजे १.७० लाख आहे. त्यानंतर, ८ वी ते हायस्कूल पर्यंतच्या वर्गांसाठी महिन्याची फी ४.५ लाख आहे.
आराध्या आणि ऐश्वर्यांच्या एकमेकांशी असलेल्या बॉण्डिंगबद्दल अनेकदा बोलले जाते. काही मुलाखतींमध्ये अभिषेक बच्चनने आराध्या संगोपणाचे संपूर्ण श्रेय ऐश्वर्याचे आहे, असे म्हणले आहे. तसेच, आराध्या आणि ऐश्वर्याच्या पाठिंब्यामुळेच मी बाहेर जाऊन काम करू शकतो, असेही अभिनेत्याने म्हणले आहे.
दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्या आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
