scorecardresearch

Video : मांडीवर बसून घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; बॉयफ्रेंडने प्रपोज करताच ‘कुछ कुछ होता है’मधली अंजली भारावली, व्हिडीओ व्हायरल

‘कुछ कुछ होता है’ सना सईदचा बॉयफ्रेंडबरोबरचा रोमँटिक व्हिडीओ समोर, सनाला बॉयफ्रेंडने खास अंदाजात केलं प्रपोज

Video : मांडीवर बसून घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; बॉयफ्रेंडने प्रपोज करताच ‘कुछ कुछ होता है’मधली अंजली भारावली, व्हिडीओ व्हायरल
'कुछ कुछ होता है' सना सईदचा बॉयफ्रेंडबरोबरचा रोमँटिक व्हिडीओ समोर, सनाला बॉयफ्रेंडने खास अंदाजात केलं प्रपोज

शाहरुख खानचा ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटामधील अंजली या पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली. अंजली हे पात्र अभिनेत्री सना सईदने साकारलं होतं. या चित्रपटामध्ये ती बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता सनाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अंजलीने साखरपुडा केला आहे. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

आणखी वाचा – रुग्णालयामध्ये जाऊन ऋषभ पंतच्या तब्येतीची केली विचारपूस, क्रिकेटरच्या भेटीनंतर अनुपम खेर यांचा सल्ला, म्हणाले, “कृपया…”

नवीन वर्षाचं औचित्य साधत सनाने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सनाचा बॉयफ्रेंड साबा वॉनरने (Csaba Wagner) गुडघ्यावर बसून तिला लग्नाची मागणी घातली. तसेच तिच्या हातामध्ये अंगठी घातली. हे पाहून सना अगदी भारावून गेली. तिने साबाला घट्ट मिठी मारली. तसेच त्याच्या मांडीवर बसत साबाला किस केलं.

पाहा व्हिडीओ

सनाने तिच्या आयुष्यामधील सगळ्यात सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. सनाने यावेळी काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. सनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये साबाने तिला गिफ्ट केलेली रिंग ती दाखवताना दिसत आहे. तसेच होणाऱ्या नवऱ्याबरोबर तिने फोटोसाठी विविध पोझही दिल्या आहेत.

आणखी वाचा – दारूचे ग्लास, मित्र मंडळींची गर्दी अन्…; ज्या घरात लग्न झालं तिथेच आलिया व रणबीरने केली जंगी पार्टी, फोटो व्हायरल

गेल्या बऱ्याच वर्षांपासून सना साबा वॉनरला डेट करत आहे. सबा हा हॉलिवूडमध्ये साऊंड डिझायनर म्हणून काम पाहतो. परदेशात राहाणारा साबा सनाबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो. सना व साबावर सध्या सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 13:26 IST

संबंधित बातम्या