बॉलिवूड अभिनेता ईरफान खानच्या निधनातून आजही प्रेक्षक पूर्णपणे सावरलेले नाहीत. येत्या २९ एप्रिलला इरफान खानला जाऊन ३ वर्षं होतील. आपल्या दमदार अभिनयाने इरफानने प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. याच इरफानचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोठ्या पडद्यावर पुन्हा या अभिनेत्याला पाहण्याची बऱ्याच लोकांची इच्छा पूर्ण होणार आहे.

‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ हा इरफानचा शेवटचा चित्रपट लवकरच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच याचा ट्रेलरही समोर आला आहे. इरफानचा मुलगा आणि अभिनेता बाबील खान याने याबद्दल माहिती दिली आहे. बाबीलने आपल्या वडिलांच्या या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

आणखी वाचा : १४व्या वर्षी आई-वडिलांचं निधन, पैशासाठी घरोघरी वस्तू विकल्या, अन्…; अर्शद वारसी बॉलिवूडचा सर्किट कसा बनला?

या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून इरफानचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक झाले आहेत. एका युझरने कॉमेंट करत लिहिले की “इरफान आम्ही कायम तुला मिस करतो.” एका युझरने इरफानच्या अभिनयाची प्रशंसा केली. आणखी एका युझरने लिहिलं की, “मी माझा आनंद व्यक्त कसा करू, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करायचा निर्णय उत्तम आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इरफानचा हा ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ चित्रपट ६ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. आधी वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता हिंदीत येणार आहे, यामुळेच याला इरफानचा शेवटचा चित्रपट म्हंटलं जात आहे. या चित्रपटात इरफानसह गोलशिफतेह फराहानी, वहीदा रहमान आणि शशांक अरोरा हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २८ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.