भाईजान सलमान खानचा आगामी चित्रपट कुठला असेल याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ‘टायगर वर्सेज पठाण’मध्ये सलमान झळकणार आहे. शिवाय करण जोहर आणि सुरज बडजात्या यांच्याबरोबर सलमान लवकरच चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे. अर्थात यापैकी कोणत्याही चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच आता ‘बजरंगी भाईजान’च्या सीक्वलबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

२०१५ साली आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला नुकतीच ८ वर्षं पूर्ण झाली. सलमान खानचा लाजवाब अभिनय आणि त्यातील लहान मुलीची अदाकारी प्रेक्षकांना प्रचंड भावली अन् त्यांनी तो चित्रपट डोक्यावर घेतला. नंतर २०२१ मध्येच या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या भागाप्रमाणेच याचीही कथा के.वी. विजयेंद्र प्रसाद लिहिणार होते.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

आणखी वाचा : आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’साठी कियारा अडवाणीने दिलेली ऑडिशन; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव

त्यानंतर बरेच दिवस यावार काहीच अपडेट समोर आले नाहीत. नुकतंच ‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टमधून या सीक्वलबद्दल नवी माहिती समोर आली आहे. जिथे पहिल्या भागाचा शेवट झाला आहे तेव्हापासून ८ ते १० वर्षांनंतरचं कथानक आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेखक विजयेंद्र प्रसादच याची कथा लिहिणार आहेत.

विजयेंद्र प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार हा सीक्वल पहिल्यापेक्षा आणखी उत्तम असेल. ‘पवनपुत्र भाईजान’ या सीक्वलमध्ये करीना कपूर ऐवजी पूजा हेगडे दिसण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे. अद्याप चित्रपटाबद्दल अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सलमान यासाठी प्रचंड उत्सुक आहे. सध्या सलमान खान आगामी ‘टायगर ३’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘बजरंगी भाईजान’चा सीक्वल २०२५ नंतरच प्रदर्शित होईल असंही म्हंटलं जात आहे.