कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. बिश्नोईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण, सलमान खानला दिलेली धमकी आणि मनोरंजन विश्वाशी असलेल्या संबंधाबाबत बिश्नोईने गौप्यस्फोट केले आहेत.

‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या ‘ऑपरेशन दुर्दांत’ अंतर्गत लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बिश्नोईला मनोरंजन विश्वाशी असलेल्या संबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आला. “फिल्म इंटस्ट्री व गँगस्टरचे संबंध आहेत का?”, असा प्रश्न बिश्नोईला विचारला गेला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, ” बॉलिवूडमध्ये होतं तसं इथे होत नाही. सध्या तरी आमचे फिल्म इंडस्ट्रीबरोबर कोणतेही संबंध नाहीत. पण भविष्यात असं घडू शकतं, हे नाकारतं येत नाही”.

हेही वाचा>> “सलमान खानने पैशांचं आमिष दाखवलं होतं, परंतु…”, धमकी देताना लॉरेन्स बिश्नोईचा मोठा दावा

“मनोरंजन विश्वातील गायक व कलाकारांकडून गँगस्टर पैसे घेत नाहीत का?” असंही विचारण्यात आलं. “आमच्या विरुद्ध गँगमधील लोकांनी घेतले आहेत. पण आम्ही त्यांच्याकडून पैसे घेतलेले नाहीत. आणि मनोरंजन विश्वातील जर कोणी विरुद्ध गँगची मदत करत असेल, तर आम्ही त्याचं उत्तर देणार”, असंही बिश्नोई म्हणाला.

हेही वाचा>> सिद्धू मूसेवालाची हत्या का केली? कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने स्वत:च केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिश्नोईने या मुलाखतीतून पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. सलमान खानचा अहंकार मोडणार, असा इशारा लॉरेन्स बिश्नोईने दिला आहे. हरीणाची हत्या करुन समाजाच्या भावना दुखावल्यामुळे सलमानला धमकी दिल्याचा खुलासा बिश्नोईने केला आहे.