गायक लकी अली आणि कवी, लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यातला वाद काही केल्या थांबेल असं वाटत नाही. कारण लकी अलीने आता पुन्हा एक खोचक पोस्ट करत जावेद अख्तर यांच्याबाबत जे बोललो त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण ही पोस्ट करताना लकी अलीने जे शब्द वापरले आहेत त्यावरुन ती दिलगिरीची पोस्ट आहे असं मुळीच वाटत नाही.
लकी अलीची आत्ताची पोस्ट काय?
उद्धटपणा हा कुरुप असतो. मी माझ्याकडून जे बोललो ते चुकीचं होतं. राक्षसांनाही भावना असतात त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो जर मी कुणाचं राक्षसी मन आणि भावना दुखावल्या असतील. या आशयाची पोस्ट लकी अलीने केली आहे. त्याच्या या पोस्टचीही चर्चा सुरु झाली आहे. कारण यात लकी अलीने दिलगिरी व्यक्त केली असली तरीही त्याचा सूर खोचकपणाचाच आहे.
लकी अलीने आधी काय पोस्ट केली होती?
प्रसिद्ध गायक लकी अली यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे. कारण एका जुन्या कार्यक्रमातील जावेद अख्तर यांच्या व्हिडिओ क्लिपने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. या व्हिडिओमध्ये जावेद अख्तर हिंदूंना उद्देशून म्हणताना दिसतात, “हिंदूंनी मुस्लिमांसारखे होऊ नये.”त्या व्हिडिओखाली लकी अली यांनी ‘एक्स’ (म्हणजेच ट्विटर) वर टिप्पणी केली “जावेद अख्तरसारखे बनू नका, तो कधीच ओरिजिनल नव्हता आणि दिसायलाही अग्ली अॅज F**k…”
जावेद अख्तर यांचा व्हिडीओ काय?
जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यात शोले चित्रपटातील यूं की ये कौन बोला या संवादाचा उल्लेख आहे. त्याबाबत जावेद अख्तर म्हणतात की शोले चित्रपटात एक प्रसंग होता त्यात धर्मेंद्र शंकराच्या मूर्तीच्या मागे लपून बोलत असतात. हेमा मालिनी यांना वाटतं की भगवान शंकर बोलत आहेत. मी आज असा सीन लिहू शकणार नाही. १९७५ मध्ये हिंदू नव्हते का? की तेव्हा लोक धार्मिक नव्हते का? तर होते. असं जावेद अख्तर म्हणाले होते. त्यावर लकी अलीने उत्तर करत जावेद अख्तर ओरिजनल नाहीत असं म्हटलं होतं. आता त्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे. पण त्याचा सूर दिलगिरीचा मुळीच नाही. उलट त्याने राक्षस आणि राक्षसी भावना असं म्हणत जावेद अख्तर यांना पुन्हा एकदा नाव न घेता लक्ष्य केलं आहे.