अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि 'आप' नेते राघव चड्ढा रविवारी (२४ सप्टेंबर रोजी) लग्नबंधनात अडकले. अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा होती. दोघांनीही उदयपूरमधील 'द लीला पॅलेस'मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नाला दोघांच्या कुटुंबियांसह बॉलीवूड सेलिब्रिटी व राजकीय नेतेही उपस्थित होते. मात्र प्रियांका चोप्रा लग्नात येऊ शकली नाही. त्यामागचं कारण तिची आई मधू चोप्रांनी सांगितलं आहे. परिणीती चोप्रा-राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले, दोघांचा पहिला फोटो समोर; साधेपणाचं चाहते करताहेत कौतुक परिणीती ही प्रियांका चोप्राची चुलत बहीण आहे. परिणीती व राघव यांनी मे महिन्यात साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला प्रियांका पती निक जोनस व मुलीबरोबर आली होती. मात्र लग्नाला ती उपस्थित राहू शकली नाही. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत परिणीतीला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावरून ती येणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. आता प्रियांका व निक लग्नाला का आले नाहीत, याचा खुलासा तिच्या आईने केला आहे. परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ व्हायरल; नवराज हंसच्या गाण्यावर पाहुण्यांचा जबरदस्त डान्स मधू चोप्रा परिणीती व राघव यांच्या लग्नासाठी उदयपूरला गेल्या होत्या. तिथून परतताना पापाराझींनी त्यांना प्रियांका व निक न येण्याचं कारण विचारलं. त्या म्हणाल्या, "ते काम करत आहेत." तर कामामुळे प्रियांकाचं बहिणीच्या लग्नाला येणं झालं नाही, असं मधू चोप्रा यांनी सांगितलं. तसेच लग्नात परिणीतीला कोणतंही गिफ्ट दिलं नाही, फक्त आशीर्वाद दिले, असंही त्या म्हणाल्या. परिणीती लग्नात कशी दिसत होती? असं विचारल्यावर मधू चोप्रा म्हणाल्या की ती आधीच सुंदर दिसते आणि लग्नात आणखी सुंदर दिसत होती. दरम्यान, परिणीती व राघव यांचं लग्न झालं असून आता पाहुणे उदयपूरहून निघत आहेत. दोघांच्या रिसेप्शन, मेहंदी व संगीतचे काही फोटो समोर आले आहेत. पण लग्नाचे फोटो अद्याप शेअर केलेले नाही.