बॉलिवूड आणि अध्यात्म यांचं कनेक्शन आपण बऱ्याचदा अनुभवलं आहे. खासकरून बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आणि रजनीश ओशो यांचं कनेक्शन आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत यशाच्या शिखरावर विराजमान असलेल्या अभिनेता विनोद खन्ना यांनी स्वतःचं करिअर बाजूला ठेवून ओशो यांच्या आश्रमात प्रवेश घेतला.

रजनीश यांच्या अनुयायांपैकी एक नाव निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचंसुद्धा नाव समोर आलं होतं. नुकतंच एका मुलाखतीमध्ये महेश भट्ट यांनी याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेता अरबाज खानबरोबरच्या ‘बॉलिवूड बबल’मधील मुलाखतीमध्ये महेश भट्ट यांनी ओशो यांच्याविषयी बऱ्याच धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’च्या ओटीटी व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार ‘ही’ नवीन गोष्ट; दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा खुलासा

महेश भट्ट म्हणाले, “मी एक सामान्य व्यक्ती होतो. मी केलेले ‘विश्वासघात’ आणि ‘मंजीले और भी है’ हे दोन्ही चित्रपट सपशेल आपटले. त्यावेळी अध्यात्माचं सगळीकडे वारं घुमत होतो. त्यावेळी मी पुण्याचे प्रसिद्ध गुरु रजनीश ओशो यांच्याकडे गेलो आणि मी त्यांच्या चरणी लीन झालो, शिवाय मी तिथे मेडीटेशनपण करायचो. विनोद खन्ना यांना मीच ओशो यांच्याकडे घेऊन गेलो. नंतर विनोद खन्नाने त्यांचं शिष्यत्व घेतलं पण मी मात्र ओशोपासून वेगळा झालो.”

View this post on Instagram

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतकंच नव्हे तर ओशो यांनी महेश भट्ट यांना धमकावलंदेखील होतं. “ओशो यांनी दिलेली माळ मी कमोडमध्ये फेकून दिली. नंतर मला विनोद खन्ना यांनी मला याबद्दल आठवण करून दिली, मला ते म्हणाले की मी त्यांनी दिलेली माळ कमोडमध्ये फेकल्याने भगवान खूप नाराज झाले आहेत. मी तेव्हा विनोद यांना म्हणालो की हा एक भंपकपणा आहे, मी मूर्ख होतो. त्यावेळी भगवान यांनी मला येऊन ती माळ पुन्हा परत द्यावी असा निरोप विनोद खन्नातर्फे पाठवला आणि मी तसं केलं नाही तर ते माझं आयुष्य उद्ध्वस्त करतील असं मला विनोद खन्नाने सांगितलं.” त्यानंतर मात्र महेश भट्ट यांनी ओशो यांच्यापासून फारकत घेतली. ओशो हे विनोद खन्नाच्या माध्यमातून त्यांच्यात फुट पाडत असल्याचा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.