अभिनेत्री आलिया भट्ट हिने १४ एप्रिल रोजी रणबीर कपूरशी लग्न केलं. लग्नानंतर दोन महिन्यातच तिने ती गरोदर असल्याची बातमी सर्वांशी शेअर केली. ६ नोव्हेंबर रोजी आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मुलीचं नाव त्यांनी राहा ठेवलं असल्याचं सांगितलं. राहाच्या जन्मापासून कपूर आणि भट्ट कुटुंबात अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. आता आपल्या लाडक्या नातीला महेश भट्ट एक खास भेट देणार आहेत.

राहाच्या जन्मांतर महेश भट्ट खूप खुश होते. “तिला पाहिल्यावर मला लहानपणीची आलिया आठवली,” असं महेश भट्ट यांनी सांगितलं होतं. नुकताच राहाचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस झाला. यावेळी कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी एकत्र येत सेलिब्रेशन केलं. आता महेश भट्ट राहाला एक खास गिफ्ट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

आणखी वाचा : स्वतःचे चित्रपट फ्लॉप होत असतानाच अक्षय कुमारला हॉलिवूडची भुरळ, ‘अवतार २’चं कौतुक करत म्हणाला…

त्यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाबद्दल भाष्य केलं. त्यांचं हे तिसरं पुस्तक ऑडिओ बुक स्वरूपातील आहे. ‘द लास्ट चॅप्टर’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकातून ते त्यांना आलेले विविध अनुभव शेअर करणार आहेत. हे पुस्तक ते आपल्या नातीला डेडिकेट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, “मी माझ्या नातीसाठी माझा आवाज पाठी सोडू इच्छितो. म्हणजे मी या जगात नसल्यावरही तो सदैव तिच्याबरोबर असेल. अनेक वर्षानंतरही या ऑडिओ बुकच्या माध्यमातून ती माझा आवाज ऐकू शकेल. मला आलेले विविध अनुभव ती स्वतः माझ्या आवाजात ऐकू शकेल.”

हेही वाचा : “माझी सून फारच…” आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलल्या नीतू कपूर

महेश भट्ट सध्या या पुस्तकावर काम करत आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशानाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी हे पुस्तक येत्या काही महिन्यात प्रकाशित होईल असं बोललं जात आहे.