जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दूसरा भाग येत आहे.

नुकतेच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग झाले. यावेळी अनेक आघाडीच्या बॉलिवूड कलाकारांनी हा चित्रपट पाहिला. यावेळी अक्षय कुमारही उपस्थित होता. या चित्रपटाबद्दल त्याला काय वाटतं हे सांगितलं आहे.

actor shreyas talpade talks about movie kartam bhugtam
‘चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे हेच यश’
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Marathi actress Sukanya Mone shares special post on Sarfarosh movie 25th anniversary
‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण! अभिनेत्री सुकन्या मोनेंची खास पोस्ट, जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, “आमिर खान…”
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
Akshay kumar movie with 15 heroines
अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटात होत्या तब्बल १५ अभिनेत्री, ३० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावले होते…
main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…

आणखी वाचा : “माझी सून फारच…” आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलल्या नीतू कपूर

२०२२ मध्ये अक्षय कुमारचा एकही चित्रपट पारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्याचं अक्षय कुमारला दुःख वाटत असतानाच दुसऱ्या चित्रपटाचे कौतुक करताना मात्र तो कचरला नाही. अक्षय नुकताच ‘अवतार २’ हा चित्रपट पाहिला आणि या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.

अक्षयने नुकतंच ‘अवतार २’बद्दल एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं, “काल रात्री मी ‘अवतार २’ हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे अद्भुत हा एकमेव शब्द आहे. मी अजूनही भारावलेलो आहे. मला या उत्कृष्ट कलाकृतीपुढे नतमस्तक व्हावसं वाटतंय.”

हेही वाचा : अक्षय कुमार नाही तर ‘हे’ अभिनेते आहेत सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय कलाकार

या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता वाढली आहे. ‘अवतार’चा हा दूसरा भाग उद्या म्हणजेच १६ डिसेंबर २०२२ या दिवशी चित्रपटगृहात झळकणार आहे. शिवाय येणाऱ्या काही वर्षात या चित्रपटाचे आणखी ३ भाग बघायला मिळणार आहेत.