मागच्या काही दिवसांपासून एक्स कपल अरबाज खान आणि मलायका अरोरा सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहेत. दोघंही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. नुकतंच अरबाजने त्याचा आगामी चित्रपट ‘पटना शुक्ला’च्या शूटिंगला सुरुवात केली. या चित्रपटाचं शूटिंग भोपाळ येथे सुरू असून याची माहिती अरबाजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. त्याच्या याच पोस्टवर पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोराने कमेंट केली आहे. तिची ही कमेंट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अरबाज खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर क्लॅपबोर्डचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करतानाच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. अरबाजने लिहिलं, “अरबाज खान प्रोडक्शनचा आगामी चित्रपट ‘पटना शुक्ला’च्या शूटिंगला सुरूवात. या चित्रपटात रवीना टंडन, सतिश शुक्ला आणि मानव विज दिसणार आहेत.” या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग हे भोपाळमध्ये होणार आहे.

आणखी वाचा- “आमच्या वयातील अंतर…” स्वतःपेक्षा लहान असलेल्या गर्लफ्रेंडबद्दल अरबाज खानने पहिल्यांदाच सोडलं मौन

अरबाज खानने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केल्यानंतर मलायकाने त्यावर कमेंट केली आहे. मलायकाने कमेंटमध्ये लिहिलं, “ऑल द बेस्ट” काही वेळाने मलायकाने ही कमेंट डिलीट केली मात्र तोपर्यंत त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मलायका अरोराची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आणि आता या दोघांमधील संबंध सुधारत असल्याचं, तसेच दोघांमध्ये सर्वकाही ठीक झाल्याचं बोललं जात आहे. याशिवाय अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियानेही यावर कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. अरबाज खानच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनीही कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Malaika Arora Arbaaz Khan

दरम्यान अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा तिच्या आयुष्यात पुढे गेली असून सध्या ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाज खान मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाजने एकमेकांशी बोलणं बंद केलं होतं. पण अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजने मलायकाचं कौतुक केलं होतं. एक आई म्हणून मलायका किती उत्कृष्ट आहे हे त्याने सांगितलं होतं. २०१७ मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला होता.