फॅशन आयकॉन मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. अवघ्या विशीत ती अभिनेता अरबाज खानला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडली. मग दोघांनी लग्न केलं पण लग्नाच्या १९ वर्षानंतर दोघे विभक्त झाले. आता एका मुलाखतीत मलायकाने घटस्फोटाचा निर्णय कसा घेतला याबद्दल सांगितलं आहे. इतकंच नाही तर पोटगीचा उल्लेख करत लोकांनी किती वाईट कमेंट्स केल्या, तो प्रसंगही सांगितला.

‘पिंकविला’ला दिलेल्या एका मुलाखतीत, मलायकाने तिच्या कुटुंबाकडून कोणताही दबाव नसतानाही २५ व्या वर्षी लग्न करण्यामागचं कारण सांगितलं. “मी अशा कुटुंबात वाढले नव्हते, जिथे ‘अरे तुला या वयात लग्न करावं लागेल’ असं म्हटलं गेलं. मला हवं तसं आयुष्य जगण्यास सांगितलं होतं. बाहेर जा, जीवनाचा आनंद घे, नवनवीन लोकांना भेट आणि रिलेशनशिपमध्ये राहा, असं सांगण्यात आलं होतं. इतकी मोकळीक असूनही माझ्या डोक्यात काय विचार आले ते मला माहित नाही, मी २२-२३ वर्षांचे असताना म्हणाले की मला लग्न करायचं आहे. माझ्यावर कोणीही लग्नासाठी दबाव आणला नाही पण मला तेच करायचं होतं, कारण त्या क्षणी माझ्याकडे हा सर्वोत्तम पर्याय होता,” असं मलायका म्हणाली.

“तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा…”, प्रसिद्ध अभिनेत्याचे सलमान खानबद्दल विधान; म्हणाला, “त्याच्या वडिलांनी…”

मलायकाने कबूल केलं की लग्न झाल्यानंतर अनेक वर्षांनी तिला हे समजलं की तिला आयुष्यात हेच हवं नव्हतं. “जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला वाटत नाही की इंडस्ट्रीमध्ये खूप महिला घटस्फोट घेत होत्या आणि आयुष्यात पुढे जात होत्या. मला माझ्यासाठी, माझ्या वैयक्तिक वाढीसाठी, मला माझ्या मुलाला आनंदी ठेवण्यासाठी, मुलाने आयुष्यात काहीतरी करावं यासाठी घटस्फोट हा योग्य पर्याय वाटला, तर मी तेच केलं,” असं मलायका म्हणाली.

“एका बापाला आणखी काय हवं?” लेकीच्या ‘या’ कामगिरीवर भारावले शरद पोंक्षे; म्हणाले, “आधी पायलट अन्…”

घटस्फोटाकडे लोक तुच्छतेने पाहतात, असंही तिने नमूद केलं. “घटस्फोटानंतर माझ्या आजूबाजूच्या कोणालाही आनंदी करण्यासाठी मी स्थिर आणि आनंदी वाटणं गरजेचं होतं, कारण त्याची सुरुवात माझ्यापासून होते आणि मी तेच केलं,” असं मलायकाने नमूद केलं.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलायका सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. मलायकाने सांगितलं की एकदा तिने परिधान केलेल्या एका ड्रेसची किंमत असलेली बातमी छापून आली होती, त्यावर खूप वाईट कमेंट्स होत्या. ‘इतका महाग ड्रेस मलायकाला परवडू शकतो कारण तिला पोटगीत खूप पैसे मिळाले आहेत,’ अशी एक कमेंट होती. ती पाहून मला धक्का बसला. या कमेंट्स पाहून मला इतकंच वाटलं की तुम्ही आयुष्यात कोणत्याही स्तरावर काहीही केले तरी त्याचा काही फरक पडत नाही, असं ती म्हणाली.