हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

‘राजनीति’ हा चित्रपट मिळण्याआधी मनोज बाजपेयी यांच्यासाठी बरीच वर्षं ही खडतर होती. त्यांना न शभणारे बरेच चित्रपट त्यांनी केवळ पैशांसाठी स्वीकारले जे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप ठरले. यावरूनच त्यांनी पत्नी शबाना रजा हिने एकदा त्यांना चांगलेच खडसावले होते. केवळ पैशांसाठी वाईट चित्रपट स्वीकारू नका अशी तंबीच तिने मनोज यांना दिल्याचं त्यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

आणखी वाचा : “हा इस्लाम नाही…” ‘द केरला स्टोरी’फेम अभिनेत्री योगिता बिहानीचं मोठं वक्तव्य

चित्रपटाचं नाव न घेता मनोज यांनी ही आठवण सांगितली. त्यांची पत्नी एक चित्रपट पाहायला गेली असताना काही प्रेक्षक त्या चित्रपटावर हसत होते. जेव्हा मनोज यांची पत्नी चित्रपट पाहून घरी आली आणि त्यांनी तिला चित्रपटाबद्दल विचारलं तर त्यावर शबाना मनोज यांना म्हणाली, “पैशांसाठी चित्रपट करणं बंद कर, आपल्यावर एवढी वेळ अद्याप आलेली नाही. तो चित्रपट फारच वाईट होता, मला लाज वाटत होती, हे फारच अपमानजनक होतं. पुन्हा कृपया असा चित्रपट करू नको. कथा आणि पात्र निवडण्यात तू माहिर आहेस आणि तेच तू करावं. तुला स्वतःला वेगळं सिद्ध करून दाखवायची काही गरज नाही.”

View this post on Instagram

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज बाजपेयी आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’दरम्यानही मनोज यांना पत्नीचा असाच अनुभव आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सदरम्यान चाललेला गोंधळ पाहून मनोज यांच्या पत्नीला हसू आवरत नव्हतं. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान मनोज यांनी या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. मनोज बाजपेयी यांचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट नुकताच ओटीटीवर आला असून प्रेक्षकांनी मनोज यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा केली आहे.