मराठमोळी शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर कामाच्या निमित्ताने एकमेकांना भेटले होते. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. शिबानी मराठी कुटुंबातील आहे, तर फरहान मुस्लीम आहे. दोघांनी २०२२ मध्ये आंतरधर्मीय लग्न केलं. फरहानशी लग्न केल्यावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं, असा खुलासा शिबानीने केला आहे.

रिया चक्रवर्तीला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंगचा सामना कसा करते याबाबत शिबानीने सांगितलं. “सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये काही तथ्य असेल तरचं तुम्ही त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे, असं मला वाटतं. लोक खोटं, तथ्यहीन बोलत असतील तर त्याचा तुमच्यावर परिणाम व्हायला नको,” असं शिबानी म्हणाली.

 Bigg Boss Marathi तील सर्वात खरा स्पर्धक कोण? आर्या जाधव ‘या’ सदस्याचे नाव घेत म्हणाली, “शोच्या सुरुवातीपासून…”

स्वतःचे अनुभव सांगत शिबानी म्हणाली, “मी फरहानबरोबर रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हा लोक मला ‘लव्ह जिहाद आणि गोल्ड डिगर’ या दोनच गोष्टी बोलायचे. पण फक्त लोक बोलतायत म्हणून ते ऐकून रडणारी मी नाही. मी गोल्ड डिगर नाही. तो मुस्लीम आहे हे सत्य आहे आणि मी हिंदू आहे. आम्ही लग्न केलं आणि दोघेही आनंदी आहोत, हे वास्तव आहे. त्यामुळे लोकांना जे वाटतं ते त्यांनी बोलावं.”

तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

“लोक माझ्याबद्दल ‘ही कोण आहे?’, ‘फरहान अख्तरशी लग्न करण्यापूर्वी ती कोण होती?’ अशा कमेंट्स करतात. मी त्या वाचते आणि विचार करते, ‘मी माझ्या आयुष्यात काही केलंय का?’ मी त्याच्याशी लग्न करण्याआधी कोण होते? किंवा त्याला भेटण्यापूर्वी ३९ वर्षे मी जगले आहे हे मला माहीत आहे का? मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीने केलेल्या कमेंटवर विश्वास ठेवायचा की स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवायचा? हे मी स्वतःला सांगते. खरं काय आणि कोणीतरी लक्ष वेधण्यासाठी तुमच्याबद्दल काय बोलतं, यात फरक आहे आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे,” असं शिबानी म्हणाली.

farhan akhtar shibani dandekar
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (फोटो – इन्स्टाग्राम)

“मीही आता फोन हातात घेऊन कोणाच्याही पोस्टवर काहीच कारण नसताना १५ कमेंट्स करू शकते. त्यामुळे हे लोक अशा कमेंट्स कारण नसताना का करतात, ते आपण कधीच समजू शकत नाही. आपण कसं वागायचं, अशा कमेंट्सना कसं सामोरे जायचं ते फक्त आपल्या हातात आहे,” असं शिबानीला वाटतं.

 तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायिका, मॉडेल आणि टीव्ही होस्ट शिबानी दांडेकरने चार वर्षांच्या डेटिंगनंतर फरहान अख्तरशी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्न केलं. त्यांचं लग्न फरहानच्या खंडाळा फार्महाऊसवर एका खासगी समारंभात झालं. या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि त्यांचे मोजकेच मित्र उपस्थित होते. यानंतर २१ फेब्रुवारी रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. फरहानचे शिबानीआधी अधुना भबनानीशी लग्न झाले होते, त्यांना दोन मुली आहेत.