दिग्गज अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. सतीश कौशिक यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक महत्त्वपूर्व व विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. अभिनयाव्यतिरिक्त सतीश कौशिक त्यांच्या मैत्रीसाठी ओखळले जायचे. त्यांच्या आणि अनुपम खेर यांच्या मैत्रीची तर खूप चर्चा होते. याशिवाय ते नीना गुप्ता यांच्याही खूप जवळचे होते.

Video: “मृत्यू जीवनाचा शेवट आहे, नात्यांचा…” सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडीओ

सतीश कौशिक यांनी १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह नसीरुद्दीन शाह, भक्ती बर्वे, नीना गुप्ता असे अनेक गुणी कलाकार होते. ‘जाने भी दो यारो’च्या सेटवर सतीश आणि नीना यांची चांगली मैत्री झाली. पुढे त्याच वर्षी त्यांनी ‘मंडी’ चित्रपटामध्येही एकत्र काम केलं होतं. जेव्हा नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यामध्ये जवळीक वाढली आणि त्या गरोदर राहिल्या. तेव्हा नीनांना लोकांकडून खूप वाईट गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. आपल्या जवळच्या मैत्रिणीला होणारा त्रास पाहून सतीश यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. दरम्यान, हा किस्सा स्वतः सतीश कौशिक यांनी सांगितला होता. नीना गुप्तांनी लग्न तर केलं नाही, पण त्यांची मैत्री कायम राहिली. पुढे नीना गुप्तांची लेक मसाबा गुप्ता हिचा पण सतीश कौशिक यांच्याशी छान गट्टी जमली.

Video: जेव्हा लेक वंशिकाबरोबर थिरकलेले सतीश कौशिक; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर मसाबा गुप्ताने पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. मसाबा गुप्ताने ‘जाने भी दो यारो’ चित्रपटातील नीना गुप्ता, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांचा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर चाहते कमेंट्स करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Masaba ? (@masabagupta)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आपण खूप हुरहुन्नरी अभिनेता गमावला’, ‘देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो’, अशा कमेंट्स करत चाहते सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहत आहेत.