१ डिसेंबर या दिवशी बॉक्स ऑफिसवर एक जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘सॅम बहादुर’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी एकमेकांसमोर उभे ठाकले. ‘अ‍ॅनिमल’ने विकीच्या ‘सॅम बहादुर’ला सगळ्याच बाबतीत मागे पछाडलं असलं तरी विकीच्या चित्रपटानेही चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.

चित्रपटात विकी कौशलच्या कामाची खूप प्रशंसा होताना दिसत आहे. नुकतंच मेघना गुलजार हीनेदेखील या चित्रपटात विकीला घेण्यामागील कारण नुकतंच स्पष्ट केलं आहे. या भूमिकेसाठी मेघनाच्या मनात पहिलं नाव विकीचं आलं अन् त्यानंतर तिने इतर कोणताही विचार न करता त्याला या भूमिकेसाठी नक्की केलं. याबद्दलच मेघनाने स्पष्टीकरण दिलं आहे.

IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
chhagan bhujbal, armstrong company
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग

आणखी वाचा : वैवाहिक बलात्काराच्या सीनबद्दल बॉबी देओल स्पष्टच बोलला; म्हणाला “अ‍ॅनिमल लोकांना जागरूक…”

मेघना म्हणाली, “मला तो एक माणूस म्हणून आणि एक अभिनेता म्हणून प्रचंड आवडतो, आणि त्यानंतर तुम्ही अशा व्यक्तीला सॅम माणेकशा यांच्या भूमिकेत पाहता ज्यांना सारा देश आपला आदर्श मानतो. अगदी ‘राजी’पासूनच एखादं पात्र लिहिताना एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं अन् मग तुम्ही पुढचा मागचा कसलाही विचार न करता त्याच नावाबरोबर पुढे जायचं ठरवता अगदी तसंच माझ्या बाबतीत घडतं. ‘राजी’च्या पाठोपाठ ‘सॅम बहादुर’मध्येही असंच घडलं. कारण माझ्या अपेक्षेपेक्षा विकी त्याच्याकडून चित्रपटासाठी जास्तच देत असतो. तो ते पात्र आपलंस करतो अन् तेच आपल्याला पाहायला मिळत आहे.”

‘सॅकनिल्क ट्रॅकर’च्या रीपोर्टनुसार ‘सॅम बहादुर’ने १२ व्या दिवशी २.४० कोटींचा व्यवसाय केला आहे. सोमवारच्या तुलनेत या चित्रपटाने मंगळवारी चांगली कमाई केली असून या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ६१.१० कोटी आहे. तर ५५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘सॅम बहादुर’ने जगभरात ८१.८० कोटींची कमाई केली असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘सॅम बहादुर’मध्ये विकी कौशलसह फातीमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबीसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.