मेट गाला २०२३ फॅशन शो नुकताच पार पडला. न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या मेट गाला शोमध्ये प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, नताशा पूनावाला यांनी हजेरी लावली होती. यंदाच्या मेट गाला शोमध्ये उद्योगपती मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीही सहभागी झाली होती. या फॅशन शोमधील ईशा अंबानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ईशा अंबानी मेट गाला २०२३ साठी खास लूक केला होता. ईशाने हिरे व मोत्यांपासून बनवलेला काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. केस मोकळे सोडत ईशाने ग्लॅमरस लूक केला होता. आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर पदम गुरंग यांनी ईशाचा हा सुंदर ड्रेस डिझाइन केला आहे. ‘मेट गाला’मध्ये सहभागी होण्याचं हे ईशाचं तिसरं वर्ष आहे. यापूर्वी ईशा २०१७ आणि २०१९ मध्ये ‘मेट गाला’त सहभागी झाली होती.
हेही वाचा>> Video : मेट गाला फॅशन शोमध्ये झुरळ आलं अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मेट गालामधील ईशाच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या फॅशन शोमधील ईशाचा एक व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी ईशाचं कौतुक केलं आहे. “याला म्हणतात फॅशन,” अशी कमेंट एकाने केली आहे.

“ड्रेस छान आहे…आणि ईशा पण मस्त दिसत आहे,” अशी कमेंटही केली आहे.

अनेकांनी ईशाची तुलना आलिया भट्टबरोबर केली आहे. “आलिया भट्टपेक्षा चांगली दिसत आहे,” असं कमेंटमध्ये लिहलं आहे.

दरम्यान, २०१९ मध्येही ईशाने पदम गुरंगचा यांनी डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. तो ड्रेस बनवण्यासाठी ३५० तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता.