अभिनेत्री आलिया भट्ट दीड महिन्यांपूर्वी आई झाली. सध्या तिने कामापासून ब्रेक घेतला असून ती लेकीबरोबर वेळ घालवत आहे. आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती स्वतःचे फोटो व्हिडीओ शेअर करत असतेच, पण बॉलिवूडमधील तिच्या मैत्रिणींच्या फोटोंवरही तिच्या कमेंट्स असतात. अलीकडेच अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीराने इन्स्टाग्रामवर चहा आणि गुजराती पदार्थाचा एक फोटो शेअर केला होता. त्यावर आलियाने केलेली कमेंट चर्चेत आहे.

‘गोपी बहू’ने मुस्लीम तरुणाशी केलंय लग्न, जाणून घ्या काय करतो देवोलीनाचा पती

मीराला विविध प्रकारचे पदार्थ खूप आवडतात आणि त्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. दोनच दिवसांपूर्वी, तिने सूर्यास्ताचा आनंद लुटताना कटिंग चाय आणि गुजराती पदार्थ उंधीयुचा एक आकर्षक फोटो इन्स्टाग्रामला टाकला होता. फोटो शेअर करताना तिने “उंधीयु आयुष्यभरासाठी. मला खात्री आहे की मी माझ्या शेवटच्या जन्मात गुजराती होते”, असं कॅप्शन तिने दिलंय.

आलिया भट्ट पाठोपाठ श्रिया पिळगावकर दिसणार देहविक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत; म्हणाली, “यासाठी मी…”

दरम्यान, नवीनच आई झालेल्या आलिया भट्टने मीराच्या फोटोवर सुंदर कमेंट केली होती. तिने लिहिले, “मला चहा हवा आहे.” यावर मीराने आलियाला चहाचे आमंत्रण दिले आणि लिहिले, मम्मी तुमची सी लिंक ओलांडण्याची वेळ आली आहे!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मीराच्या पोस्टवर आलियाने केलेली कमेंट चर्चेत (फोटो – इन्स्टाग्रामवरून स्क्रीनशॉट)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ६ नोव्हेंबर रोजी पालक झाले. त्यांनी आपल्या लेकीचं नाव राहा कपूर ठेवलं आहे. रणबीर सध्या आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे, तर आलिया लेक राहाबरोबर वेळ घालवत आहे.