ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती सध्या रुग्णालयात आहेत. ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशातच त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते बऱ्यापैकी स्थिर आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. ७३ वर्षीय मिथुन चक्रवर्ती यांनी छातीत दुखत असल्याची तक्रारी केली, त्यानंतर त्यांना शनिवारी त्यांना कोलकात्यातील येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. “ते बरे होत आहेत, ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत आणि त्यांची प्रकृती आता चांगली आहे. त्यांनी आहारही घेतला आहे. डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाईल,” असं वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं. करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता कसा बनला स्टार? एका वर्षी केलेले सलग ३३ फ्लॉप सिनेमे मिथुन चक्रवर्ती यांच्या यापूर्वीच रुग्णालयात इतर बऱ्याच वैद्यकीय चाचण्या व एमआरआय करण्यात आले आहे. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांना नुकतेच पद्मभूषण या देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांनी हिंदी, बंगाली, ओडिया, भोजपुरी आणि तमिळ भाषेतील सुमारे ३५० चित्रपटांमध्ये काम केले आहे.