ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना मिथुन यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता, त्याबद्दल त्यांचा मुलगा नमाशीने माहिती दिली आहे. नमाशीने वडिलांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली व त्यांच्याबरोबरच्या मैत्रीपूर्ण नात्याबद्दल भाष्य केलं आहे. मिथुन यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे.

“ते आजारी असल्याने मी काळजीत होतो, पण नंतर त्यांनी रागावून मला सांगितलं की ते आता बरे आहेत,” असं नमाशी सेलेब्रानिया स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. वडिलांसह असलेल्या मैत्रीपूर्ण नात्याबद्दल नमाशीने सांगितलं. तो किंवा त्याची भावंडं महाक्षय, उश्मे, दिशानी कधीच त्यांना पप्पा म्हणत नाही, असा खुलासा त्याने केला.

१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”

“आम्ही त्यांना बाबा, पप्पा म्हणत नाही. माझं माझ्या पालकांशी खूप मैत्रीपूर्ण नातं आहे, आम्ही वडिलांना नावाने हाक मारतो. आमची खूप चांगली मैत्री आहे, आम्ही त्यांना मिथुन म्हणतो. आम्ही चौघेही मित्र आहोत,” असं नमाशी म्हणाला. वडिलांनीच आपल्याला ‘पप्पा’ म्हणू नका असं सांगितलं, असं नमाशीने सांगितलं. “त्यांनीच याची सुरुवात केली, ते म्हणायचे, प्लीज मला पप्पा म्हणू नका. फक्त मला मिथुन म्हणा,” असं नमाशी म्हणाला.

‘F**k off’ म्हणत मिथुन चक्रवर्तींच्या मुलाला सलमान खानने दिशा पाटनीसमोर दिलेला दम, नमाशी खुलासा करत म्हणाला…

वडिलांबरोबरच्या बालपणीच्या आठवणींबद्दल विचारल्यावर नमाशी म्हणाला, “मी प्रामाणिकपणे सांगतोय की लहानपणी मी त्यांना फारसं पाहिलंच नाही, कारण ते चार शिफ्ट करायचे. माझा जन्म १९९२ मध्ये झाला, त्यावेळी ते यशाच्या शिखरावर होते. १९९४ मध्ये आम्ही उटीला शिफ्ट झालो आणि वडिलांनी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आणि तिथेच ते शूटिंगही करायचे, ते चार शिफ्ट करायचे. त्यामुळे आमची सकाळी भेट व्हायची. नाश्त्याआधी मी त्यांना भेटायचो, मग ते तयार होऊन निघून जायचे. त्यामुळे मला महिन्यातून दोन दिवस ते भेटायचे, कारण त्यादिवशी त्यांची सुट्टी असायची. लहानपणी मी सर्वाधिक वेळ माझ्या आईबरोबर घालवला आहे.”

“…तर माझा भाऊ सुपरस्टार झाला असता”, अभिषेक बच्चनचं नाव घेत मिथुन चक्रवर्तींच्या मुलाचं वक्तव्य

नमाशी पुढे म्हणाला, “माझ्या वडिलांसोबतच्या गोड आठवणी २००१ नंतरच्या आहेत, कारण त्यानंतर त्यांनी कमी काम करायला सुरुवात केली. मग आम्ही जास्त वेळ एकत्र घालवला. त्यांना जेवण बनवायला खूप आवडतं. मोकळ्या वेळेत ते चिकन, मटण, मासे, वरण, भात, पोळ्या असे सर्व पदार्थ त्यांना बनवता येतात.”