Mrs Chatterjee Vs Norway Official Trailer : एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीचे नाव आवर्जुन घेतले जाते. गेल्या काही वर्षात ती फार कमी चित्रपटात झळकली आहे. त्यातील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केलेली नाही. मात्र आता लवकरच राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा या चित्रपटाची कथा एक आई तिच्या मुलांसाठी देशाविरुद्ध त्यांच्या कायद्याविरुद्ध कशी लढते यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात कोलकाता सोडून नॉर्वेमध्ये स्थायिक झालेल्या मिसेस चॅटर्जी (राणी मुखर्जी) कडून होते. यात तिचा नवरा हा नोकरी करणारा दाखवण्यात आला आहे. त्या दोघांना दोन मुलं असून एक सुखी कुटुंब दाखवण्यात आले आहे. पण एक दिवस या सुखी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागावी अशी घटना घडते.

suryakumar yadav
MI VS RCB: ‘सूर्या’चं असणं मुंबई इंडियन्ससाठी इतकं का महत्त्वाचं?
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

नॉर्वे या देशातील कायद्याचा दाखला देत तिची दोन्हीही मुलं तिच्यापासून दूर नेली जातात. ती एक चांगली आई नाही, ती मानसिक रुग्ण आहे, असा दावाही केला जातो. या घटनेमुळे मिसेस चॅटर्जीचं संपूर्ण आयुष्यचं बदलून जातं. यानंतर मिसेस चॅटर्जी तिची मुले परत मिळवण्यासाठी देशाविरुद्ध कशाप्रकारे कायदेशीर लढाई लढतात? या दरम्यान त्यांना काय काय भोगावे लागते? हे दाखवण्यात आले आहे.

राणी मुखर्जीच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले जात आहे. यात तिचा दमदार अभिनयही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात मुलांना हाताने भरवणे, त्यांना शेजारी झोपवणे, त्यांच्यावर प्रेम करणे, माया लावणे या गोष्टी पाहायला मिळत आहेत. पण याच गोष्टी त्यांच्या विरोधात वापरल्या जातात, हे पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील अनेक दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहत आहे.

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट १७ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे.