ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरुनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून याचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याचसंदर्भात नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच लल्लनटॉपच्या ‘सिनेमा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. नसीरुद्दीन यांनी वैज्ञानिक चार्ल्स डार्विन आपल्या पाठ्यपुस्तकातून काढून टाकल्याबद्दल खंत व्यक्त केली. विज्ञानाच्या मदतीने पुढे जाण्याऐवजी आपण आणखी मागे जात आहोत असंदेखील ते म्हणाले.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

आणखी वाचा : “ते चौघेही मुस्लिम…” नसीरुद्दीन शाह यांनी सांगितला ‘A Wednesday’ चित्रपटादरम्यानचा ‘तो’ किस्सा

नसीरुद्दीन म्हणाले, “विज्ञानाच्या ऐवजी आपण पुन्हा मागे अंधश्रद्धेकडे वाटचाल करत आहोत. ही गोष्ट केली तर कॅन्सर बरा होईल, ही गोष्ट केली तर विमान उडेल अशा कित्येक भ्रामक कल्पना आहेत ज्यांच्या आपण अधीन जात आहोत. चार्ल्स डार्विनला पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलं आहे, काही दिवसांनी ही गोष्ट आइनस्टाईनच्या बाबतीतही घडेल. त्यानंतर ही लोक मुलांना काय शिकवणार आहेत?”

‘इस्रो’ या संस्थेच्या प्रमुख व्यक्तीचा उल्लेख करत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “इस्रोच्या हेड ज्या बहुतेक एक महिला आहेत. त्यांनी मध्यंतरी असा दावा केला की हे सगळे वैज्ञानिक शोध आपल्या पुराणांमध्येच खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहेत आणि पाश्चिमात्य देशांनी या गोष्टीचा फायदा घेत सगळं श्रेय घेतलं आहे. आता असे विचार असलेल्या व्यक्तीशी तुम्ही नेमका कसा संवाद साधणार किंवा वाद घालणार?”

आणखी वाचा : “त्यांना सरकारकडून…” ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह ट्रोलर्सबद्दल स्पष्टच बोलले, पंतप्रधानांचाही केला उल्लेख

अशाप्रकारच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे नसीरुद्दीन बऱ्याचदा अडचणीत सापडले आहेत. त्यांची आगामी वेब सीरिज ‘ताज’ ही तुम्हाला ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.