scorecardresearch

Premium

जेवताना मित्रानेच नसीरुद्दीन शाहांच्या पाठीत भोसकला होता चाकू; ‘या’ अभिनेत्याने वाचवलेला जीव, वाचा पूर्ण घटना

“थोड्या वेळाने माझ्या पाठीवर एक…”, नसीरुद्दीन शाहांनी सांगितला होता प्रसंग

Naseeruddin Shah Was Once stabbed by his actor friend
नसीरुद्दीन शाहांबरोबर नेमकं काय घडलं होतं?

नसीरुद्दीन शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. गेली अनेक दशकं बॉलीवूडमध्ये सक्रिय असलेल्या शाह यांनी आतापर्यंत खूप सिनेमांमध्ये काम केलं आहे. दरम्यान सिनेमात काम करत असताना त्यांच्या मित्रानेच त्यांच्यावर चाकूने वार केला होता आणि एका अभिनेत्याने त्यांना वाचवलं होतं. ‘अँड देन वन डे’ या पुस्तकात त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

“माझे जन्मगाव…”, ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ बनल्यावर कोल्हापूरच्या विशाल पिंजानीची पोस्ट

Pooja bhatt birthday special hero Bollywood film industry journey
Pooja Bhatt: वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट
omar abdulla
“मोदी आणि शाहांना रात्री का भेटू?”, गुलाम नबी आझादांच्या आरोपांवर फारुख अब्दुल्लांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
women tehsildars car chased by bikers in jalgaon
चित्रपटाप्रमाणे थरार… जेव्हा महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग होतो
woman committed suicide with her two-month-old baby connection with Postpartum depression
‘तिनं असं का केलं…?’

१९७७ मध्ये आलेल्या ‘भूमिका’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकेदिवशी नसीरुद्दीन ओम पुरीबरोबर जेवायला गेले होते. तेवढ्यात त्यांचा मित्र जसपाल तिथे आला. नसीर व जसपाल यांचं नातं तणावपूर्ण होतं. “आम्ही एकमेकांकडे दुर्लक्ष केले पण, पण त्याची नजर माझ्यावर खिळली, तो माझ्या मागे दुसर्‍या टेबलावर बसायला गेला, असं मला वाटलं. पण थोड्या वेळाने माझ्या पाठीवर एक लहान तीक्ष्ण वस्तूने वार केल्याचं मला जाणवलं. मी तिथून उठण्याचा प्रयत्न करू लागलो. पण मी हालचाल करण्याआधीच ओम ओरडला आणि त्याला पकडलं. ज्याच्याजवळ असलेल्या चाकूवरून रक्ताचे थेंब खाली पडत होते. त्याने पुन्हा एकदा वार करण्याचा प्रयत्न केला, पण ओम आणि इतर दोघांनी त्याला नियंत्रित केलं,” असं त्यांनी सांगितलं.

गोष्ट पडद्यामागची: हॉलीवूडमध्ये झळकलेल्या ‘गाईड’ चित्रपटाची गोष्ट, देव आनंद यांच्या सिनेमात वहिदा रेहमान यांची वर्णी कशी लागली?

नसीरुद्दीन यांनी पुढे लिहिलं, “जसपालला किचनमध्ये नेण्यात आलं आहे, असं ओमने मला सांगितलं. तो मला डॉक्टरांकडे घेऊन जात होता पण रेस्टॉरंटच्या कर्मचार्‍यांनी पोलीस येईपर्यंत आम्हाला जाऊ देणार नसल्याचं म्हटलं. जेव्हा रुग्णवाहिका आली, तेव्हा ओमने परवानगीशिवाय आत चढण्याची चूक केली. त्याने बॉस-मॅनला चिडवले आणि पोलिसांना माझ्याशी नीट वागण्यास सांगितले. त्याला उतरण्यास सांगण्यात आलं पण तो उतरला नाही. आम्ही रुग्णवाहिकेत होतो आणि आम्ही कुठे जातोय याबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे ते आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ नयेत, यासाठी मी प्रार्थना करत होतो.”

जसपालने वार केल्याने नसीरुद्दीन यांना जखम झाली होती. “रक्तस्त्राव थांबत नव्हता, तीव्र वेदना होत होत्या आणि पोलिसांना नेमकं काय घडलंय ते कळत नव्हतं. आम्हांला काही प्रश्न विचारले आणि नंतर आम्ही जुहू येथील कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हे सगळं झाल्यानंतर मी घरी एकटा असताना जसपाल भेटायला आला होता. पण माफी मागण्याऐवजी त्याने जे काही घडले त्यात पर्सनल काहीच नव्हतं, असं म्हटलं होतं,” असं नसीरुद्दीन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Naseeruddin shah was once stabbed by his actor friend jaspal om puri saved life hrc

First published on: 07-10-2023 at 18:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×