ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या अनेकदा दैनंदिन आयुष्यातील आयुष्यातील घडामोडी फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत माहिती देत असतात. सध्या नीना यांची प्रकृती बरी नाही आणि त्या दिल्लीत आहेत. त्या एका रुग्णालयात चेकअप करण्यासाठी पोहोचली होत्या. पण रुग्णालयात त्यांच्याबरोबर असं काही घडलं की त्या चांगल्याच चिडल्या.
‘आज तक’च्या वृत्तानुसार, नीना गुप्ता चेकअपसाठी एका रुग्णालयात गेल्या होत्या. यादरम्यान, चेकअपपूर्वी माहिती भरण्यासाठी त्यांना भलामोठा फॉर्म देण्यात आला होता. आजारी असूनही एवढा मोठा फॉर्म भरावा लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पण फॉर्म भरत असतानाच त्यांना धर्म विचारण्यात आला आणि त्यांचा राग अनावर झाला.
नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करून फॉर्मची झलक दाखवली होती. या व्हिडीओमध्ये त्या म्हणतात, “मी एका मोठ्या रुग्णालयात आले आहे. इथे मी एक नोंदणी फॉर्म भरत आहे. मी तो भरता भरता आणखी आजारी पडेन. मी फार आजारी नसले तरी हा फॉर्म भरत आहे आणि आता एक कॉलम आला आहे आणि तो धर्माचा आहे.”
“ओS मानेS याSSS”, जेव्हा विमानात शिरताच किरण मानेंना ऐकू आला आवाज; म्हणाले, “दचकून बघितलं तर…”
नीना गुप्ता यांनी नोंदणी फॉर्ममध्ये धर्माचा कॉलम पाहिला आणि त्या संतापल्या. “अरे हे घडत आहे. अरे देवा, आता आमचं काय होणार?” असं त्या म्हणतात. दरम्यान, नीना यांनी रुग्णालयात जाताना एक व्हिडीओ शेअर केला होता.
दरम्यान, नीना गुप्ता यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच त्यांची ‘पंचायत ३’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी त्या ‘मस्त में रहने का’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्याबरोबर जॅकी श्रॉफदेखील होती. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.