अभिनेते संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या ‘वध’ या अपकमिंग थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. महरौलीमध्ये नुकत्याच झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर नीना गुप्ता यांच्या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. जवळपास २ मिनिट ४१ सेकंदांचा हा दमदार ट्रेलर तुम्हाला श्वास रोखून धरण्यास भाग पाडतो. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची कथा दाखवली जात असून त्यात दोन स्टार कलाकारांची जोडी काम करताना दिसणार आहे.

‘वध’च्या बहुचर्चित ट्रेलर प्रेक्षकांना अक्षरशः जागीच खिळवून ठेवतो. संजय मिश्रा पहिल्यांदा अशाप्रकारची भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसते. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा जास्तच हिट ठरला. एकीकडे नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या भूमिका खूपच निरागस वाटत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याकडून एक असा गुन्हा झाला आहे ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नाही. याच गुन्ह्याच्या भोवती या चित्रपटाची कथा फिरत असते.

आणखी वाचा- गरोदर असल्याचं कळताच नीना गुप्तांनी जेव्हा विवियन रिचर्ड्सला केला होता फोन, आठवण सांगत म्हणाल्या, “मी खूप…”

या चित्रपटाबद्दल बोलताना संजय मिश्रा म्हणाले, “एक अभिनेता म्हणून मी अशाप्रकारच्या भूमिकेची कधीच कल्पना केली नव्हती. तेही नीना गुप्ता यांच्या बरोबर अशी भूमिका साकारायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे आता प्रेक्षक चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात याबाबत आम्हाला बरीच उत्सुकता आहे.”

नीना गुप्ता या चित्रपटाबाबत म्हणाल्या, “‘वध’ ही एक रंजक आणि थ्रीलर कथा आहे. मी या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी खूप चांगला वेळ व्यतित केला. ही कथा पडद्यावर जेवढी दिसतेय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळी आणि जास्त आहे. प्रेक्षक केवळ ट्रेलरच नाही चित्रपटही खूप एन्जॉय करतील असं मला वाटतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वध’ हा चित्रपट राजीव बरनवाल आणि जसपाल सिंह संधू यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती, जे स्टुडियोज आणि नेस्क्ट लेव्हल प्रोडक्शनने केली आहे. तर लव रंजन आणि अंकुर गर्ग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. येत्या ९ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.