अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. तिने २०१८ मध्ये अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं. अंगदला डेट करत असतानाच नेहा गरोदर राहिल्याने तिने घाईत लग्न केलं होतं. अनेक वर्षांपासून जवळच्या मैत्रिणी आहेत, तरी नेहाने लग्नाला न बोलावल्याने धक्का बसला होता असं वक्तव्य सोहाने केलं. यावर नेहाने प्रतिक्रिया दिली.
“त्यावेळी नुसता गोंधळ होता, मी गरोदर होते आणि…” असं नेहा हॉलीवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना म्हणाली. सोहा अली खान ही नेहाची खूप जवळची मैत्रीण आहे. नेहा गरोदर आहे हे ज्या मोजक्या लोकांना माहीत होतं, त्यापैकी सोहा एक होती. तरी तिला नेहाने लग्नाचं निमंत्रण दिलं नव्हतं. यामागचं कारणही तिने सांगितलं. “मी गरोदर आहे हे माहित असलेल्या लोकांपैकी ती एक होती. कारण आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवत होतो आणि मी भोवळ येऊन कुणाल खेमूच्या अंगावर पडले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा भेटलो आणि सोहाला मी गरोदर असल्याचं सांगितलं,” असं नेहा म्हणाली.
अंगद व नेहा डेट करत होते, तेव्हाच ती गरोदर राहिली. पण त्यांचं खूप नवीन होतं, त्यामुळे याबद्दल आई-वडिलांना सांगण्याऐवजी मैत्रिणींना सांगणं सोपं होतं असं नेहाने म्हटलं होतं. “असं असतं की तुमचं लग्न झालेलं नाही, तुम्ही त्या मुलाला फार काळ डेटही केलंही नसतं आणि असं होतं. तुम्ही किती पुढारलेले किंवा मागास विचारांचे असाल तरी अशी गोष्ट तुमच्या मित्रांना सांगणं सोपं असतं. त्यातही असे मित्र ज्यांना नुकतंच बाळ झालं असेल,” असं नेहा म्हणाली.
नेहाने गरोदर असताना अंगद बेदीशी लग्न केलं होतं. यावरून तिला बरेच प्रश्न विचारण्यात आले होते. “तुम्हाला नेहमीच ‘तू गरोदर आहेस म्हणून तुम्ही एकत्र आहात का? की तुम्हाला खरंच एकत्र राहायचंय’ असे प्रश्न या परिस्थितीत विचारले जातात,” असं नेहा म्हणाली होती.
नेहा व अंगद यांनी मे २०१८ मध्ये लग्न केलं आणि नोव्हेंबरमध्ये त्यांची मुलगी मेहरचा जन्म झाला. त्यांची मुलगी सात वर्षांची असून त्यांना ३ वर्षांचा गुरीक नावाचा मुलगा आहे.