बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेशला नील माथूर या नावानेही ओळखलं जातं. २००७ मध्ये आलेल्या ‘जॉनी गद्दार’ चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर तो इतरही अनेक चित्रपटांमध्ये दिसला पण तो कधीही ए-लिस्ट स्टार बनू शकला नाही. त्याची आतापर्यंतची कारकीर्दीत बरेच चढउतार आले. पण तो वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत मात्र नेहमीच राहिला. शाहरुख खान आणि सैफ अली खानचा जाहीर अपमान असो किंवा दीपिका पदुकोणच्या घराबाहेर ३ तास ​​उभं राहणं असो. आज त्यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात असाच एक मजेशीर किस्सा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नील नितीन मुकेशने ‘विजय’ (१९८८) आणि ‘जैसी करनी वैसी भरनी’ (१९८९) या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्याचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. मात्र, त्याच्या अभिनयाचे नक्कीच कौतुक झालं. त्यानंतर या अभिनेत्याने सुधीर मिश्रा यांच्या ‘तेरा क्या होगा जॉनी’, ‘न्यूयॉर्क’, ‘आ देखें जरा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. २०१० मध्ये त्याचा ‘लफंगे परिंदे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो अभिनेत्री दीपिका पदुकोणबरोबर रोमान्स करताना दिसला होता.

या चित्रपटाच्या वेळी दीपिका आणि नील यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. संपूर्ण बी-टाऊनमध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावरही याबाबत बोललं जात होतं. दोघं एकमेकांना डेट करत असल्याची वृत्तही समोर आली होती. अशातच नील नितीन मुकेशने दीपिकाबद्दल एक ट्वीट केलं होतं. जे बरंच गाजलं.

आणखी वाचा- नील नितीन मुकेशचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; पोस्ट शेअर करत अभिनेत्याने केलं नव्या वर्षाचं स्वागत

‘लफंगे परिंदे’ चित्रपटाच्या वेळी नीलने एक ट्वीट केलं होतं. त्याने या ट्वीटमध्ये लिहिलं, “मी दीपिकाच्या घराच्या दरवाजाबाहेर काल तीन तास गुलाब घेऊन उभा होतो. नंतर माझ्या लक्षात आलं की ती तर ‘आरक्षण’च्या प्रमोशनसाठी गेलेली असणार.” त्याच्या या ट्वीटमधून त्याने दीपिकाप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्याचा अंदाज अनेकांनी त्यावेळी लावला होता आणि त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा आणखीच होऊ लागल्या होत्या.

दरम्यान नंतर नीलने आपल्या या ट्वीटचं स्पष्टीकरण दिलं होतं. एका मुलाखतीत नील नितीन मुकेशने याविषयी व्यक्त झाला होता. “मी आणि दीपिका चांगले मित्र आहोत. ती मला माझ्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहे. अगदी सकाळी ४ वाजता सुद्धा मी तिला फोन करु शकतो. तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहिल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर अपोआप हसू उमटतं. ती फार गोड आणि चांगली व्यक्ती आहे”, असं तो म्हणाला.

आणखी वाचा- ‘पठाण’च्या ट्रेलरनंतर दीपिका पदुकोणचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, म्हणाली…

दुसरीकडे दीपिकाने नीलबद्दल बोलताना एका मुलाखतीत म्हटलं होतं, “‘नीलसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. मला वाटतं की तो एक छान आणि काळजी घेणारा व्यक्ती आहे. तो सेटवर सर्वांची काळजी घेतो. चित्रपटसृष्टी हे कुटुंब आहे असं त्याला वाटतं, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यावर त्याचा विश्वास आहे. मला नीलसोबत काम करायला आवडले.” अर्थात या चित्रपटानंतर दीपिका-नीलने पुन्हा एकत्र काम केलं नाही आणि या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neil nitin mukesh birthday actor stood 3 hours at deepika padukone house outside with roses mrj
First published on: 15-01-2023 at 11:27 IST