Nick Jonas Appreciates Priyanaka Chopra : लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनस ही जोडी कायमच चर्चेत असते. प्रेक्षकांच्या आवडत्या सेलिब्रिटी जोडींपैकी ही एक आहे. प्रियांका व निक जेव्हा भारतात येतात, तेव्हा त्यांचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचे चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक असतात. या जोडीमधील केमिस्ट्री त्यांना खूप आवडते. निक जोनस अनेकदा त्याच्या बोयकोचं कौतुक करताना दिसतो.
निकने आता एका मुलाखतीमध्ये प्रियांकाचं भरभरून कौतुक केलं आहे. त्याने ‘द स्कूल ऑफ ग्रेटनेस पॉडकास्ट’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने प्रियांकाबद्दल वक्तव्य केलंय, यामुळे त्याने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे. निकला यामध्ये “समज तुझा या जगातला शेवटचा दिवस आहे, तेव्हा तू तुझ्या मुलीला कोणत्या तीन गोष्टी सांगशील” असा प्रश्न विचारण्यात आलेला.
निक जोनस या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला, “लोकांशी चांगलं वागल्याचा कधीच पश्चाताप होणार नाही, कितीही कठीण परिस्थिती असली तरी कायम इतरांशी चांगलंच वागावं, तुझ्या घरातले दरवाजे इतरांसाठी कायम उघडे असले पाहिजे, प्रत्येकाचं तुझ्या घरात स्वागत झालं पाहिजे, तुझ्या घरात त्यांच्या राहण्यासाठी आणि खाण्यासाठी जागा असावी,” असं म्हटलं आहे.
निक जोनस पुढे प्रियांकाचं कौतुक करत म्हणाला, “ती एक खूप चांगली जोडीदार आहे, कायम मला खंबीरपणे साथ देत असते. मी माझ्या लेकीला सांगेन की तुझी आई संत आहे. तिने तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधीच काहीच चुकीचं केलेलं नाही.” पुढे निक म्हणाला, “तिच्यासारखी स्त्री बायको म्हणून माझ्या आयुष्यात असणं माझ्या व आमच्या मुलीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. तिच्यासारख्या हुशार स्त्रीसह आयुष्याचा हा प्रवास खूप सुखकर आहे आणि एक वडील म्हणून हा प्रवास माझ्यासाठी खूप खास ठरतोय.”
प्रियांका चोप्रा व निक जोनस यांनी १ डिसेंबर २०१८ साली लग्न केलं होतं. या दोघांमध्ये दहा वर्षांचं अंतर आहे. प्रियांका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. आता या जोडीच्या लग्नाला सहा वर्ष झाली आहेत; तर यांना मालती मेरी नावाची एक गोंडस मुलगीदेखील आहे.