अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनास हे लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे. दोघांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने निक प्रियांका आणि त्यांची लेक मालती मेरीसह भारतात आला होता. भारतात आल्यावर अनेकांनी त्याला ‘जिजू’ अशी हाक मारली. आता यावर निकने प्रतिक्रिया दिली आहे.

निक जोनास भारतात आल्यावर त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओंमध्ये पापाराझी त्याला जिजाजी, जिजू, निकवा ए निकवा अशा विविध नावांनी हाक मारताना पाहायला मिळाले. त्या वेळी निकने यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता निकने भारतात आल्यावर या सगळ्या नावांनी बोलावल्यावर त्याला कसं वाटलं हे त्याने सांगितलं आहे.

आणखी वाचा : …आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निक म्हणाला, “बरेच लोक मला जिजू म्हणतात. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी सर्व फोटोग्राफर्स मला जिजू म्हणत होते. एका फोटोग्राफरने त्याला ‘ओ निकुआ’ म्हटलं त्यावर म्हणाला, ‘हो, मी ते ऐकलं आहे. भारतात पुन्हा येऊन मला खूप छान वाटलं. माझं भारतावर खूप प्रेम आहे. करोनामुळे मला इथे येता येत नव्हतं. मी दीर्घ काळाने भारतात आलो. त्यामुळे ही खरोखरच मजेदार सहल होती आणि आता मला इथे दिली गेलेली सगळी नावं ऐकून खूप मस्त वाटलं.”

हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा एप्रिल महिन्यात पार पडला. हा उद्घाटन सोहळा मोठ्या राजेशाही थाटात संपन्न झाला. या वेळी बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमधील अनेक स्टार्स उपस्थित होते. याचबरोबर क्रीडा, राजकारण, समाजकार्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीदेखील या सोहळ्याला आवर्जून हजर होती.