‘बिग बॉस मराठी’च्या ५व्या पर्वाची चांगलीच चर्चा झाली होती. सूरज, अंकिता, धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक विशेषकरुन प्रेक्षकंमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. यासह अजून एका स्पर्धकाची चर्चा झाली ती म्हणजे निककी तांबोळी. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात निक्कीने सहभाग घेतला होता, त्याआधी ती हिंदी ‘बिग बॉस’ मध्येही दिसली होती. हिंदीसह मराठी ‘बिग बॉस’ मधील तिच्या विधानांची बरीच चर्चा झाली होती. विशेष म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगावंकर यांच्यासह झालेल्या वादानंतर सोशल मीडियावर देखील तिची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. ‘बिग बॉस मराठी’मध्ये तिच्या खेळासह अरबाजबद्दलच्या नात्याचीही चर्चा झाली होती. तर कार्यक्रमानंतरही दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसले.
अशातच नुकतच निक्कीने ‘पिंकव्हिला’ला एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये तिने तिच्या स्वभावाबद्दल सांगतिलं आहे. तिने म्हटलं आहे की, “लोकांना वाटतं मी खूप अहंकारी आहे पण तसं नाहीये. माझ्यासाठी माझं कुटुंब, माझं काम, माझे पाळीव प्राणी आणि देव याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या व्यतिरिक्त मी इतर कुठल्याही गोष्टीला फार महत्त्व देत नाही.त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी अहंकारी आहे पण खरंतर तसं नाहीये त्यांना माझ्याबद्दलचा गैरसमज आहे.”
निक्कीच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर तिने २०१९ साली आलेल्या “चिकाटी गाडीलो चिथाकोतुडू” या तेलगू हॉरर-कॉमेडी चित्रपटातून पदार्पण केलं होतं .यासह त्याच वर्षी ती ‘कांचना ३’ या प्रसिद्ध तामिळ चित्रपटात झळकली होती. पुढे ती हिंदी ‘बिग बॉस’ च्या १४व्या पर्वात सहभागी झाली होती. नंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातही ती पाहायला मिळाली. निक्की ‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमातही झळकली होती.
तर नुकतच निक्की ‘सोनी’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात पाहायला मिळाली.या कार्यक्रमादरम्यान ती विविध पदार्थ बनवताना दिसली. निक्की या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीतही पोहोचली होती. परंतु अभिनेता गौरव खन्ना या कार्यक्रमाचा विजेता ठरला आणि निक्की दुसऱ्या क्रमांकाची दावेदार ठरली. आता निक्की ‘स्टारप्रवाह’वरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’नंतर पहिल्यांदाच निक्की मराठी कार्यक्रमात सहभागी झाली आहे.